Alka Lamba  Dainik Gomantak
गोवा

खाण व्यवसाय बंद करून भाजपने गोव्याला आर्थिक संकटात टाकले; अलका लांबा

दैनिक गोमन्तक

खाण व्यवसाय बंद करून भाजप सरकारने सर्वप्रथम गोव्याला आर्थिक संकटात टाकले आहे. 134 वर्षांच्या अखिल भारतीय काँग्रेस समितीने कधीच गोव्याला आर्थिकरित्या कुमकुवत केले नाही. काँग्रेस पक्षाने कधीच देशाला आर्थिकरित्या इतर राष्ट्रांच्या तुलनेत मागे ठेवले नव्हते. देशातील युवावर्ग बेरोजगारीच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील भाजप सरकार कुठल्या आधारावर विकास झाला असे छातीठोकपणे सांगत आहे. याला पूर्णपणे केंद्रातील भाजप सरकार बरोबर राज्य सरकार कारणीभूत असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा (Alka Lamba) यांनी दिले.

वास्को मतदार संघाचे काँग्रेस (Congress) पक्षाचे उमेदवार तथा माजी आमदार (MLA) अल्मेदा यांच्या बायणा ब्रह्मस्थळ येथील मुरगाव पालीका उद्यानात आयोजित जाहीर सभेत काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अखिल गोवा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष नजीर खान, कर्नाटकचे माजी आमदार शरण्णा सन्नुर, नगरसेविका श्रद्धा महाले, प्रशांत नाईक, साजिद खान, नगरसेवक मोन्तेरो माथाईस व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना अलका लांबा म्हणाला की देशातील शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजप सरकारला गोव्या बरोबर केंद्रातून हद्दपार करण्यासाठी गोवावासींयानी काँग्रेसला साथ देणे गरजेचे आहे. गोव्यात खाण व्यवसाय बंद करून येथील जनतेला मेटाकुटीस टाकणाऱ्या भाजप सरकारला जनता कदापि माफ करणार नाही. गोव्यात बदल पाहिजे यासाठी भाजपचा (BJP) पराभव निश्चित असल्याची माहिती लांबा यांनी दिली.

गोव्यात इतर पक्ष फक्त मतांचे विभाजन करून काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपला साथ देण्यासाठी येथे दाखल झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने सत्ता काँग्रेस बरोबर युती केल्याने प्रस्थापित केली आहे. तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) काँग्रेस पक्षाने साथ दिल्याने महायुतीचे सरकार चालत आहे. गोव्यात मात्र हे दोन्ही पक्ष आमच्या विरोधात मत विभागणीसाठी दाखल झाले असल्याचा खळबळजनक आरोप अलका लांबा यांनी केला. गोव्यात विधानसभा निवडणुकीत फक्त काँग्रेस व भाजप अशी लढत असणार असून यात काँग्रेस बाजी मारणार असल्याची माहिती अलका लांबा यांनी दिली.

पुढे बोलताना अलका लांबा म्हणाल्या की वास्कोचे (Vasco) काँग्रेस उमेदवार कार्लोस अल्मेदा यांचा विजय निश्चित असून त्यांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन करताना वास्को मतदार संघाचे मंत्रीपद आल्मेदा यांना अवश्य मिळणार असल्याची माहिती अलका लांबा यांनी दिली. वास्कोचा विकास मुद्दामहून भाजप सरकारने अडवून आल्मेदा यांची बदनामी केली आहे. भाजप मनोहर पर्रीकर यांचा पक्ष राहिला नसल्याची माहिती शेवटी लांबा यांनी दिली.

काँग्रेस उमेदवार कार्लोस आल्मेदा यांनी आपल्या भाषणात सांगितले की वास्कोचा विकास अवश्य होणार आणि तो काँग्रेस पक्ष करणार यात अजिबात शंका नसल्याचे सांगून वास्कोतील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यातस तसेच योजना सर्वांपर्यंत पोचवताना कधीच भेदभाव केला नाही असे आल्मेदा यांनी शेवटी सांगितले. यावेळी शरण सन्नूर,साजिद खान, प्रशांत नाईक व इतरांनी भाजपवर घणाघाती आरोप करीत चांगलाच समाचार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवेश आमोणकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

SCROLL FOR NEXT