Gram Panchayat Karapur Dainik Gomantak
गोवा

Gram Panchayat Karapur: आमदार प्रेमेंद्र शेट यांना धक्का; कारापूर-सर्वण ग्रामपंचायत हातातून निसटली

Gram Panchayat Karapur: आमदार समर्थक दत्तप्रसाद खारकांडे यांची सरपंचपदी तर तन्वी सावंत यांची उपसरपंचपदी वर्णी लागली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Gram Panchayat Karapur

मये मतदारसंघातील कारापूर-सर्वण पंचायत अखेर आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हातातून पूर्णपणे निसटली आहे. या पंचायतीच्या रिक्त उपसरपंचपदी आमदारविरोधी गटातील दिव्या नाईक यांची वर्णी लागली आहे. आज गुरुवारी झालेल्या निवडणुकीत नाईक यांची बिनविरोध निवड झाली.

गेल्या एप्रिल महिन्यात मावळत्या उपसरपंच उज्ज्वला कवळेकर यांच्याविरोधातील अविश्वास ठराव संमत झाल्यापासून या पंचायतीचे उपसरपंचपद रिक्त होते. कारापूर-सर्वण पंचायतीच्या सरपंचांपाठोपाठ आता उपसरपंच पदाच्या निवडणुकीतही विरोधी गटाची सरशी झाल्याने या पंचायतीवरील आमदारांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे.

ऑगस्ट 2022 साली झालेल्या पंचायत निवडणुकीनंतर आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या नेतृत्वाखाली कारापूर-सर्वण पंचायतीत भाजप गटाची सत्ता स्थापन झाली होती. आमदार समर्थक दत्तप्रसाद खारकांडे यांची सरपंचपदी तर तन्वी सावंत यांची उपसरपंचपदी वर्णी लागली होती. तन्वी सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर उज्ज्वला कवळेकर यांची उपसरपंचपदी वर्णी लागली होती.

मात्र गेल्या फेब्रुवारी सत्ताधारी गटात फूट पडली. त्यानंतर गेल्या मार्च महिन्यात खारकांडे यांची सरपंचपदावरून तर एप्रिल महिन्यात कवळेकर यांची उपसरपंचपदावरून चलबांगडी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT