Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पुन्हा 'भाजपचाच भगवा फडकणार'; ओपिनियन पोलचा अंदाज

मतदारांचा कौल समजून घेण्यासाठी सी-वोटर आणि एबीपी माझा या संस्थांनी ओपिनियन पोल घेतला.

दैनिक गोमन्तक

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. 14 फेब्रुवारीला होणाऱ्या या निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर करत आहेत. मात्र, मतदार कुणाला पसंती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदारांचा कौल समजून घेण्यासाठी सी-वोटर आणि एबीपी माझा या संस्थांनी ओपिनियन पोल घेतला. (Goa Assembly Election opinion poll latest updates)

यामधून समोर आलेली आकडेवारी काही पक्षांसाठी दिलासा देणारी ठरत आहे तर काहींसाठी डोकेदुखी. या ओपिनियन पोलच्या माहितीनुसार, राज्यात परत एकदा 'भगवा' फडकण्याची शक्यता आहे. राज्यातील 40 विधानसभा जागांपैकी भाजपला 19 ते 23 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच भाजप सत्ता स्थापनेसाठी लागणारी 21ची 'मॅजिक फिगर' पार करणार असे दिसते.

ओपिनियन पोलवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "आम्ही या पोलचे स्वागत करतो. भाजपने गेली 10 वर्षे गोव्यात तळागाळाला जाऊन काम केले आहे. कोरोना महामारी, पूर या सारख्या कठीण काळात आम्ही गोव्याच्या जनतेबरोबर भक्कमपणे उभे होतो. हे निकल याचेच परिणाम आहेत.

या पोलमध्ये काँग्रेसला (Congress) 4 ते 8 जागांवर समाधान मानावे लागेल. तर आम आदमी पार्टीचा 'केजरीवाल फॅक्टर' पक्षाला 5 ते 9 जागांवर विजय मिळवून देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी 2 ते 6 जागा मिळवेल असा अंदाज आहे. ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार, अन्य पक्ष व अपक्ष मिळून 4 जागांपर्यंत मजल मारू शकतात. या अन्य पक्षांमध्येच तृणमूलची गणना केली जात आहे. ममतांची बंगालची जादू इथे गोव्यात चालताना सध्या तरी दिसत नाही. मतांची टक्केवारी बघता भाजपला (BJP) 32% मत मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या पाठोपाठ कॉंग्रेस 20%, आप 22%, मागोप 8% व अन्य 18% मत मिळवतील, असा अंदाज आहे.

भ्रष्टाचारावर बोलताना सावंत म्हणाले, "आरोप लावणे हे विरोधी पक्षांचे काम आहे. गव्हर्नन्समध्ये आम्ही देशात 3 स्थानी आहोत. गोव्याचे लोक आमच्यासोबत उभे आहेत."

गोव्यातील राजनैतिक समीकरण रोज बदलत आहे. मायकल लोबो (Michael Lobo) यांचा भाजपला राम राम व राहुल गांधी यांनी काल घेतलेली बैठक गोव्याच्या राजकारणावर किती परिणाम कारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काळात ओपिनियन पोलचे अंदाज कसे बदलतात याकडे मतदारांचे लक्ष असेल.

राजकीय पक्ष जागा

भाजप 19 ते 23
कॉंग्रेस 4 ते 8
आप 5 ते 9
मागोप 2 ते 6
अन्य 0 ते 4


राजकीय पक्ष मतांची टक्केवारी (%)

भाजप 32
कॉंग्रेस 20
आप 22
मागोप 8
अन्य 18

Opinion Poll

दरम्यान ईटीजी रीसर्चने केलेल्या पोलनुसार भाजपला 20 ते 22 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

राजकीय पक्ष जागा

भाजप 20 ते 22
कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी 7 ते 9
आप 6 ते 8
मागोप आणि तृणमूल 3 ते 5
अन्य 0 ते 2

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT