BJP may face trouble
BJP may face trouble Dainik Gomantak
गोवा

भाजपची 'या' 8 मतदारसंघात पंचाईत

दैनिक गोमन्तक

गोव्यात आगामी काळात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजले आहेत. यातच राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी राज्यातील नेतृत्व निकराने प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपचा पराभव करण्यासाठी तृणमूल, कॉँग्रेस (Congress) आणि आपसह स्थानिक राजकीय पक्षांनी मोट बांधली आहे.

अशातच भाजप 38 जागांवर आपले उमेदवार देणार असल्याचे वृत्त आहे, उद्या भाजपची (BJP) यादी जाहीर होणार आहे. मात्र इतर 26 मतदारसंघांत भाजपच्या वतीने मैदानात उतरणारा किंवा इच्छुक उमेदवार हा एकच आहे. मात्र, मांद्रे या मतदारसंघांत (constituency) दयानंद सोपटे आणि लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली आहे. तर डिचोली मतदारसंघांत राजेश पाटणेकर आणि शिल्पा नाईक यांनी निवडणूक (election) लढवण्यासाठी तयारी केली आहे.

काणकोण या मतदारसंघांत इजिदोर फर्नांडिस आणि रमेश तवडकर यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली आहे. तर सांगे या मतदारसंघांत सुभाष फळदेसाई आणि सावित्री कवळेकर यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली आहे. सांताक्रूझ या मतदारसंघांतून टोनी फर्नांडिस, अनिल होबळे आणि आग्नेल डिकुन्हा असे तीन इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी दर्शवली आहे.

पणजी मतदारसंघांतून बाबूश मोन्सेरात आणि उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) मैदानात उतरणार आहेत. या मतदारसंघातून भाजपने उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे ते कोणत्या पक्षातून लढणार की अपक्ष लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुंभारजुवे मतदारसंघातून पांडुरंग मडकईकर तसेच सिद्धेश नाईक भाजपकडून मैदानात उतरणार आहेत असा दोघानी दावा केला आहे. सावर्डे मतदारसंघातून दीपक प्रभु पाऊस्कर तसेच गणेश गावकर यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली आहे.

तर सांगे मतदारसंघातून सुभाष फळदेसाई तसेच सावित्री कवळेकर उमेदवारांनी आपली तयारी दर्शवली आहे. त्यामुळे या आठ मतदारसंघात भाजपसमोर मोठी अडचण ठरली आहे. यात ज्या मतदारसंघात ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळणार तो आपल नशीब आजमवणार मात्र ज्या उमेदवरला उमेदवारी नाकारली जाणार तो बंडखोरी करणार की पक्षाचा निर्णय मान्य करणार हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

या 26 मतदारसंघांत भाजपच्या वतीने मैदानात उतरणारा इच्छुक उमेदवार हा एकच

- पर्वरी : रोहन खंवटे

- हळदोणा : ग्लेन टिकलो

- सांतआंद्रे : फ्रान्सिस सिल्वेरा

- फातोर्डा : दामू नाईक

- मये : प्रेमेंद्र शेट

- साखळी : डॉ. प्रमोद सावंत

- पेडणे : प्रवीण आर्लेकर

- थिवी : नीळकंठ हळर्णकर

- ताळगाव : जेनिफर मोन्सेरात

- म्हापसा : जोशुआ डिसोझा

- वास्को : दाजी साळकर

- दाबोळी : मॉविन गुदिन्हो

- कुठ्ठाळी : आंतोनियो वाझ

- कुंकळ्ळी : क्लाफासियो डायस

- मडगाव : मनोहर आजगावकर

- केपे : चंद्रकांत कवळेकर

- कुडचडे : नीलेश काब्राल

- शिवोली : दयानंद मांद्रेकर

- साळगाव : जयेश साळगावकर

- कळंगुट : गुरुदास शिरोडकर

- पर्ये : विश्वजीत राणे

- वाळपई : दिव्या राणे

- प्रियोळ : गोविंद गावडे

- फोंडा : रवी नाईक

- शिरोडा : सुभाष शिरोडकर

- मुरगाव : मिलिंद नाईक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT