Sankalp Amonkar And Giriraj Pai Vernekar Dainik Gomantak
गोवा

South Goa: दक्षिणेत ख्रिश्चन पाद्रींमुळेच पल्लवी धेंपेंचा पराभव, भाजप नेत्यांचा दावा; विरोधात मतदानाचा होता आरोप

South Goa: संदर्भात प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केलेल्या विधानाचे देखील वेर्णेकर आणि आमोणकरांनी समर्थन केले.

Pramod Yadav

South Goa

लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागा जिंकणाच्या दावा करणाऱ्या भाजपच्या पदरी दक्षिणेतून निराशा पडली. दक्षिणेतील पराभवाचे खापर आता भाजप नेत्यांनी ख्रिस्ती धर्मगुरुंवर फोडले आहे. दक्षिणेत मतांचे ध्रुवीकरण झाल्याचा आरोप भाजप आमदार संकल्प आमोणकर यांनी केला. अशाप्रकारे हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

मुरगावचे भाजप आमदार संकल्प आमोणकर आणि नेते गिरीराज पै वेर्णेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दक्षिण गोव्यातील भाजप उमेदवारांचा पराभव ख्रिश्चन पाद्रींमुळेच झाल्याचा दावा आमदार आमोणकर यांनी यावेळी केला.

दक्षिणेत धर्मगुरूंच्या हस्तक्षेपामुळे मतांचे ध्रुवीकरण झाले. अशाप्रकारे निवडणुकीत हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याचे गिरीराज पै वेर्णेकर यावेळी म्हणाले. तसेच, या संदर्भात प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केलेल्या विधानाचे देखील वेर्णेकर आणि आमोणकरांनी समर्थन केले.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांचा जवळपास चौदा हजार मतांनी पराभव पत्कारावा लागला होता. काँग्रेसने उमेदवार बदलला तरी विजयाची माळ अखेर विरियातोंच्या गळ्यातच पडली.

माजी मंत्री निलेश काब्राल यांनी उठवला होता आवाज

गोव्यातील दोन लोकसभा जागांसाठी सात मे रोजी मतदान पार पडले. राज्यातील चर्चमधून भाजप विरोधात मतदान करण्याचे आवाहन करण्यात आल्याचा आरोप माजी मंत्री निलेश काब्राल यांनी केला होता

राज्यातील काही चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन करण्यात आल्याचा आरोप काब्राल यांनी केला होता. याबाबत त्यांच्याकडे पुरावे देखील असल्याचा खुलासा त्यांनी केला. तसेच, वेळ पडल्यास योग्यवेळी ते उघड करेन असेही ते म्हणाले होते.

दरम्यान, पुन्हा एकदा याबाबत भाजप नेत्यांनी वक्तव्य केल्याने हा विषय नव्याने चर्चेत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT