Former CM Manohar Parrikar Death Anniversary Dainik Gomantak
गोवा

मनोहर पर्रीकरांना भाजप नेत्यांकडून अभिवादन, उत्पलही उपस्थित

पणजीतील समाधीस्थळी जाऊन माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांना वाहिली आदरांजली

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आज जयंती आहे. स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त निमित्त काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे, आमदार बाबुश मोन्सेरात, निळकंठ हळणकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी पणजीतील समाधीस्थळी जाऊन माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. या दरम्यान उत्पल पर्रीकर यांची भाजप नेत्यांसोबतची उपस्थिती लक्षणीय ठरली. (BJP leaders paid homage to Manohar Parrikar)

Former CM Manohar Parrikar Death Anniversary

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मधून पदवीधर झालेले ते पहिले मुख्यमंत्री

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मधून पदवीधर झालेले ते पहिले मुख्यमंत्री होते.पर्रीकर यांनी 2014 ते 2017 पर्यंत भारताचे संरक्षण मंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये काम केले. नंतर 2017 च्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांची नियुक्ती गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली.

राज्याचा बुलंद आवाज: मनोहर पर्रीकर

राजधानी पणजीचा आणि भाजपचा, राज्याचा बुलंद आवाज म्हणून ओळख कायम राहीलेल्या दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांची राजकीय कारकिर्द तशी संघर्षाचीच. भाजपला गोव्यात (Goa) शून्यातून सत्तेपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी पक्ष संघटनेच्या बांधणीतही त्यांनी हातभार लावला. भाजपकडे (BJP) सत्ता नव्हती, सरकार डळमळीत झाले त्यावेळी कार्यकर्त्यांत उत्साह कायम असावा यासाठीही ते झटले. त्यांना भाजप नेते लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar), दत्ता खोलकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांना साथ दिली.

उत्पल पर्रीकर आणि बाबूश मोन्सेरात यांचा वाद मात्र कायम चर्चेत

गोवा विधानसभा निवडणुकीत पणजी मतदारसंघातून उत्पल पर्रीकर आणि बाबूश मोन्सेरात यांचा वाद चांगलाच चर्चेत होता. दरम्यान या दोघांच्या वादामुळे भाजपसमोर पेचप्रसंग उभा ठाकला होता. उत्पल पर्रीकर यांना तिकीट नाकारून भाजपने बाबूश मोन्सेरात यांना तिकीट दिल्याबद्दल उत्पल पर्रीकर यांनी भाजप विरोधात बंड पुकारला होता; मात्र आता ते भाजप नेत्यांसोबत दिसून येत असुन ही बाब राज्यात चांगलीच चर्चेची ठरत आहे. बाबूश मोन्सेरात यांनी उत्पल पर्रीकरांना जवळजवळ सातशे मतांनी पराभूत केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ronaldo Goa Visit: फुटबॉलप्रेमींचा हार्टब्रेक! अल नासर गोव्यात दाखल; ख्रिस्तियानो रोनाल्डो अनुपस्थित, चाहते नाराज

Narkasur Chor: गोव्यात 'नरकासुरच पळवला'!! भल्या पहाटे दुचाकीवरून नेला चोरून, व्हिडीओ पाहून हसू आवरेना; Watch Video

Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ! रिजवानची केली हकालपट्टी; 'या' आक्रमक गोलंदाजाच्या हाती दिले नेतृत्व

Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

Sancoale Theft: गोव्यात आणखी एक मोठी चोरी, सांकवाळ येथे फ्लॅट फोडला; 8.5 लाखांचे दागिने, महागडी घडयाळे लंपास

SCROLL FOR NEXT