भाजपच्या एका बड्या नेत्याने मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला आता मनोहरच्या पुढे पर्रीकर व त्यांचा फोटोही लावण्यात येणार आहे अशी माहिती भाजपचे प्रभारी सी. टी. रवी यांनी दिली आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव मनोहर पर्रीकरांच्या नावावरुनच ठेवण्यात आले आहे. तसे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तसे जाहीर केले आहे. आता मनोहरच्या पुढे पर्रीकरही जोडले जाणार आहे तसेच विमानतळावर पर्रीकरांचा फोटोही लावण्यात येणार आहे असेही सी. टी. रवी यांनी सांगितले.
गोवा भाजपच्या कोअर कमिटीची मिटींग आज पणजी येथे पार पडली. मोपा विमानतळाचे नाव "मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ" असल्याची सरकारने घोषणा करताच सोशल मिडीयावर नामांतरणासंबंधित काही पोस्ट व्हायरल झाल्या. तसेच मोपा येथील विमानतळाला देण्यात आलेले 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ' हे नाव दुरूस्त करून 'मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे देण्यात यावे अशी मागणी देखील भाजप प्रवक्ते साविओ रॉड्रिग्ज यांनी केली होती. दरम्यान, आता मनोहरच्या पुढे पर्रीकरही जोडले जाणार आहे तसेच विमानतळावर पर्रीकरांचा फोटोही लावण्यात येणार आहे असेही सी. टी. रवी यांनी सांगितले.
गोव्यातील मोपा विमानतळाचे रविवार, 11 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मोपा विमानतळ गोव्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी आणि पर्यटनाला चालना देण्याचे काम करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांनी "मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ" असे विमानतळाच्या नावाची औपचारिक घोषणा यावेळी केली. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या नामकरणाच्या वादावर पडदा पडला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.