Sadanand Tanavade
Sadanand Tanavade Dainik Gomantak
गोवा

लोकसभा निवडणुकांसाठी भाजपची तयारी सुरू: तानावडे

दैनिक गोमन्तक

सासष्टी: विधानसभा निवडणुका संपल्या म्हणून आमचा पक्ष गप्प बसणार नाही. जूनमधील पंचायत आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपने कंबर कसली असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मडगावात सांगितले. (BJP is preparing for upcoming Lok Sabha elections)

नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांचा सत्कार बुधवारी मडगावातील दक्षिण गोवा (South Goa) जिल्हा भाजप कार्यालयाच्या सभागृहात त्यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी माजी खासदार व पक्षाचे सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर, सचिव सर्वानंद भगत, प्रवक्ते उरफान मुल्ला, दक्षिण गोवा मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास नाईक, सरचिटणीस सत्यविजय नाईक, शेख जीना, सालसेत तालुक्यातील आठ मंडळांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.

एका सामान्य कार्यकर्त्याचा सामान्य माणसाशी जास्त संबंध येतो, असे कदंब महामंडळ तुयेकर यांना दिले आहे. त्यामुळे सामान्यांच्या समस्या तुयेकर यांना समजतील. सासष्टीत भाजप काय करू शकतो हे नावेलीत उल्हास तुयेकरांच्या रूपाने सर्वांनाच समजले आहे, असे ॲड. नरेंद्र सावईकर म्हणाले. याप्रसंगी सर्वानंद भगत यांनीही विचार मांडले. दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष तुळशीदास नाईक यांनी स्वागत केले. सत्यविजय नाईक यांनी आभार मानले. सूत्रसंचालन दिलीप नाईक यांनी केले.

कार्यकर्ता झाला आमदार

पंचायत निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त पंच निवडून येतील, यासाठी भाजप (BJP) प्रयत्न करणार आहे. लोकसभा निवडणुकीत (Election) दक्षिणेतही भाजपचा उमेदवार निवडून येईल, असा विश्र्वास तानावडे यांनी व्यक्त केला. प्रत्येक मतदारसंघातील प्रश्र्न कार्यकर्त्यांनी सोडवावेत. कार्यकर्ता हीच पक्षाची खरी ताकद आहे. नावेलीत एक कार्यकर्ता आमदार म्हणून निवडून आला, असेही तानावडे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT