BJP Government: भाजपने विकासाभिमुख काम केले असून शासनाच्या सर्व योजना लोकांच्या बँक खात्यापर्यंत पोचवल्या आहेत. त्यामुळे देशातील एजंटगिरी भाजपने संपविली आहे. पक्षाचे ध्येय हे प्रत्येक गरिब व्यक्तीला सुखसोयी मिळाव्यात, हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी वाळपई येथे केले.
पूर्वी 72 एअरपोर्ट होते, ते आता वाढून मागील नऊ वर्षात 142 एअरपोर्ट देशात झाले आहेत. त्यामुळे देशांतर्गत सोयी वाढल्या आहेत. भाजपच्या कार्यकाळात खंडणी वसुलीचे प्रकार बंद झाले आहेत, असे ते म्हणाले.
यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार दिव्या राणे, वाळपई नगराध्यक्ष शेहझीन शेख, वाळपई भाजप मंडळ अध्यक्ष रामनाथ डांगी, विनोद शिंदे, नगरगाव सरपंच संध्या खाडीलकर, प्रसाद खाडीलकर, नगरगाव जि.पं.स राजश्री काळे, नगरसेवक प्रसन्ना गावस, वसुउद्दीन सय्यद, शराफत खान, अनिल काटकर, उसगावचे उमाकांत गावडे, गुळेली सरपंच नितेश गावडे, सावर्डे सरपंच उज्वला गावकर, खोतोडा सरपंच नामदेव राणे उपस्थित होते.
दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले की, पंतप्रधान मोदींमुळे देशात परिवर्तन झाले आहे. विविध योजनेद्वारे महिलांचे सबलीकरण, सशक्तीकरण झाले आहे. सदानंद तानावडे राज्यात पक्षासाठी, जनतेसाठी झटत आहेत. पक्ष म्हणून सर्वांना अधिकाराने काम करण्याची संधी आहे. सत्तरीत असंख्य महिलांपर्यंत आमच्या सरकारच्या योजना पोचविल्या आहेत. आपल्या पंतप्रधानांनी देशाची मान जागतिक पातळीवर उंचावली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.