Goa BJP Dainik Gomantak
गोवा

BJP: विकास भाजपसाठी येत्या निवडणुकीत ठरणार गेमचेंजर

भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून सांकवाळचे सरपंच गिरीश पिल्लई यांचे नाव...

दैनिक गोमन्तक

पणजी: माझा आतले आणि बाहेरचे यावर विश्वास नाही म्हणूनच कुठ्ठाळी मतदारसंघासाठी भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून सांकवाळचे सरपंच गिरीश पिल्लई यांचे नाव केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवल्याची माहिती पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. राज्य सरकारने केलेला विकास आणि समाजहितासाठी सुरू केलेल्या योजनांच्या आधारे गोव्यात (Goa) पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पणजीच्या निवडणूक (Goa Election) कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते. (Goa BJP government will come again in Goa on strength of development)

यावेळी गुदिन्हो म्हणाले, की भाजपने (BJP) गेल्या दहा वर्षांमध्ये गोव्याला स्थिर सरकार दिले आहे. गोव्याचा सर्वांगीण विकास केला आहे. हा विकास मतदारांच्या समोर आहे आणि तोच विकास भाजपसाठी येत्या निवडणुकीत गेमचेंजर ठरणार असून या विकासाच्या बळावरच भाजप पुन्हा एकदा बहुमताने जिंकणार आहे. 2014 साली केंद्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर राज्याचा विकासाचा वेग वाढला. आणि त्यामुळे राज्यातील रस्ते, पूल, रुग्णालये यासारख्या साधनसुविधा उभारल्या.

केंद्र सरकारने गोव्यासाठी करोडो रुपयांचे अनुदान दिले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या एकाच खात्याचे 22 हजार कोटीचे प्रकल्प राज्यासाठी दिल्याचे माविन गुदिन्हो यांनी यावेळी सांगितले.

‘बंगालचे हिंसक राजकारण गोव्यात नको’

दिल्ली आणि पश्चिम बंगालचे पक्ष गोव्यात येऊन मतदारांना विविध आमिषे दाखवत आहेत. मात्र, त्या पक्षांच्या नेत्यांनी आपल्या राज्यामध्ये अगोदरच्या या योजना सुरू कराव्यात त्यानंतरच गोवेकरांना पोकळ आश्वासने द्यावीत. असे सांगून लोकांनी पश्चिम बंगालचे हिंसक राजकारण गोव्यात येऊ देवू नये. एका महिन्यापूर्वी हे पक्ष विरोधात होते तेच पक्ष आता सत्तेसाठी गठबंधन करत आहेत. मात्र, गोमंतकीय जनता या गठबंधनांना बळी न पडता विकासासाठी व स्थिर सरकारसाठी भाजपलाच मत देईल आणि भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल, असे माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

Goa Opposition Alliance: महाआघाडी झाली तरी जागावाटपाचा तिढा सुटणार कसा? समान कार्यक्रमाशिवाय आघाडीचे भविष्य अंधारात; सरदेसाईंच्या समीकरणांवरुन संभ्रम!

SCROLL FOR NEXT