पर्वरी येथिल मंत्रालयाच्या सभा कक्षात समाजाच्या उच्चस्तरीय बैठकीत माहीती देताना उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व इतर Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गौळी धनगर समाजाला आदिवासी दर्जा देण्यासंबंधी भाजप सरकार गंभीर

आपल्या हक्काच्या मागणीपासून वंचित असलेल्या समाजाला नक्कीच न्याय मिळणार असा आशावाद गौळी धनगर समाजाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील गौळी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा विषय प्रलंबित आहे. त्याला मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने चालना देऊन, केंद्रीय पातळीवर या संबंधी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे आपल्या हक्काच्या मागणीपासून वंचित असलेल्या समाजाला नक्कीच न्याय मिळणार असा आशावाद गौळी धनगर समाजाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी पर्वरी येथिल मंत्रालयाच्या सभा कक्षात घेतलेल्या बाराही तालुक्यातील समाजाच्या उच्चस्तरीय बैठकीत गेल्या महिन्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा तसेच आरजीआय संस्थेच्या अधिकाराच्या सोबत घेतलेल्या बैठकीची सविस्तर माहिती दिली.

यावेळी समाज कल्याण सचिव राजशेखर रेड्डी, माजी सनदी अधिकारी एन डी अगरवाल, केंद्रीय समितीचे सल्लागार डॉ जानू झोरे डॉ शांताराम सुर्मे डॉ राजेंद्र लांबोर, कुळे पंचायत सरपंच मनिष लांबोर, गोवा धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष बि डी मोटे, गोमंतक धनगर समाज उन्नती मंडळाचे केंद्रीय समिती पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या सावित्री कवळेकर, तसेच इतर तालुक्यातील धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी गौळी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या भुमिकेची माहिती देताना, मागच्या महिन्यात दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा तसेच आरजीआय संस्थेच्या अधिकाऱ्या सोबत झालेल्या बैठकीत त्यांच्याने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सांगितले, त्याच प्रमाणे काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरजीआय संस्थेतर्फे समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यासंबंधी उपस्थित केलेल्या काही शंकांचे निरसन करणारे उत्तर सदर संस्थेला पाठवण्यात आले आहे, त्यासाठी राज्याचे मुख्य सचिव परिमल राय, समाज कल्याण विभागाचे सचिव राजशेखर रेड्डी, एन डी अगरवाल बरेच परीश्रम घेतले असल्याचे उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी सांगितले.

त्याच प्रमाणे येणाऱ्या काही दिवसांत पुन्हा एकदा दिल्लीला जाऊन, या विषयाचा पाठपुरावा करण्यात येईल, यावेळी ज्या प्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व आरजीआय या अधिकाराणीकडे बैठकीत झालेल्या निर्णयानुसार समाज कल्याण खात्याच्या वतीने उत्तर पाठवले आहे असे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी समाज कल्याण सचिव राजशेखर रेड्डी तसेच एन डी अगरवाल यांनी आपले विचार व्यक्त केले. त्याच प्रमाणे या वेळी उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी या चर्चेत सहभागी होताना समाजाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या कार्याची स्तुती करून, या संबंधी समाजाच्या वतीने पुर्ण पाठिंबा दर्शविला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT