Sadanand Shet Tanavade takes oath as Rajyasabha MP Rajyasabha TV
गोवा

'मी सदानंद शेट शपथ घेतो की...' तानावडेंनी राज्यसभेत मराठीत घेतली खासदारकीची शपथ Video

तानावडे मावळते खासदार विनय तेंडुलकर यांच्या जागी बिनविरोध निवडून गेले आहेत.

Pramod Yadav

Sadanand Shet Tanavade takes oath as Rajyasabha MP

सदानंद शेट तानावडे यांनी आज (दि.31) राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. तानावडे यांनी सभागृहात मराठीत शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी राज्यसभा सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्यासह सभागृहाला अभिवादन केले.

तानावडे मावळते खासदार विनय तेंडुलकर यांच्या जागी बिनविरोध निवडून गेले आहेत. विनय तेंडुलकर 28 जुलै रोजी राज्यसभेतून निवृत्त झाले.

गोव्यातील एकमेव राज्यसभा जागेवर सदानंद शेट तानावडे यांची बिनविरोध निवड झालीय. विनय तेंडुलकर यांच्या जागी तानावडे यांनी आज शपथ घेतली.

विनय तेंडुलकर जुलै 2017 मध्ये राज्यसभा खासदार म्हणून निवडून गेले. विनय तेंडुलकर यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजप पक्षाचे आभार मानले. मी आज सभागृहातून निवृत्त होत असलो तरी राजकारणातून होणार नाही. येत्या 2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असे तेंडुलकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT