Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: 'ती आंदोलने राजकीयदृष्‍ट्या प्रेरित आहेत'; 'नीट' पेपरफुटीवरून भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Damu Naik NEET Paper Leak: नीट परीक्षेतील पेपरफुटीसंदर्भात विद्यार्थी करत असलेली मागणी रास्‍त आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: नीट परीक्षेतील पेपरफुटीसंदर्भात विद्यार्थी करत असलेली मागणी रास्‍त आहे. परंतु, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांची याबाबतची आंदोलने राजकीयदृष्‍ट्या प्रेरित आहेत’, अशी टीका भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी केली.

पणजीतील भाजप कार्यालयात गुरुवारी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत दामू बोलत होते. सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे (पीडब्‍ल्‍यूडी) मंत्री दिगंबर कामत आणि आमदार रुडॉल्‍फ फर्नांडिस यावेळी उपस्‍थित होते. वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्‍वपूर्ण असलेल्‍या ‘नीट’ परीक्षेचे पेपर फुटल्‍याचे समोर आल्‍यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणातील संशयितांवर तत्‍काळ कारवाई करण्‍याचे निर्देश जारी केले.

त्‍यानुसार अनेकांना अटकही करण्‍यात आली. केंद्र सरकार याविषयावर संसदेत चर्चा करण्‍यासही तयार आहे. तरीही विरोधी पक्ष विद्यार्थ्यांचा प्रश्‍‍न बाजूला ठेवून केंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहेत. लोकशाहीच्‍या मार्गाने चालणाऱ्या सरकारसमोर जाणीवपूर्वक अडथळे आणण्‍याचे काम त्‍यांच्‍याकडून सुरू आहे, असे दामू नाईक म्‍हणाले.

काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याविषयावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या निवासस्‍थानासमोर आंदोलन छेडत आपण किती बालिश आहोत, हे दाखवून दिले. त्‍यांच्‍या या कृतीचा प्रदेश भाजपतर्फे आपण निषेध व्‍यक्त करतो. केंद्र सरकार हा विषय योग्य प्रकारे हाताळत आहे. परीक्षेचे पेपर फुटणे ही नवीन बाब नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत, असेही दामू नाईक यांनी नमूद केले.

...तर दीपके भाजपात येतील!

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्‍थापक अभिजीत दीपके यांना भाजप सरकारने केलेली कामे माहीत नाहीत. त्‍यांना ती समजतील, तेव्‍हा ते स्‍वत:हून भाजपात दाखल होतील, असा विश्‍‍वास दामू यांनी व्‍यक्त केला.

मोर्चाची गरज नव्‍हती!

‘नीट’ पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांकडून होत असलेली मागणी योग्‍य असून, केंद्र सरकार त्‍याबाबत पूर्णपणे सकारात्‍मक आहे. त्‍यामुळे विद्यार्थ्यांना थेट संसदेवर मोर्चा नेण्‍याची गरज नव्‍हती. असे प्रश्‍‍न सोडवण्‍यासाठी जो प्‍लॅटफॉर्म असतो, त्‍यावरूनच पुढे जाणे गरजेचे असते. विद्यार्थी ही देशाची खरी ताकद आहे. त्‍यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्‍यांच्‍यासाठी विविध योजना आखत आहेत, असेही दामू नाईक म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT