‘Vikas Tirth Yatra’ in South Goa Dainik Gomantak
गोवा

Vikas Tirth Yatra : भाजपच्या दक्षिण गोव्यातील ‘विकास तीर्थ यात्रे’ ला सुरुवात

आमचे भाजप सरकार संवेदनशील : सदानंद शेट तानावडे

गोमन्तक डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाने आज शनिवारी मेगा जनसंपर्क अभियानांतर्गत नव्याने उद्घाटन झालेल्या केबल स्टे झुआरी पुलावरून दक्षिण गोव्यातील ‘विकास तीर्थ यात्रे’ ला सुरुवात केली.

विकास तीर्थ यात्रेचे उद्दिष्ट पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सुशासन, चांगली कामे पाहणे, तपासणे आणि इतरांना त्यांचे वर्णन करणे हे आहे.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सवाईकर आदींच्या उपस्थितीत विकास तीर्थ यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

"आमचे भाजप सरकार संवेदनशील आहे. काँग्रेसचे राहूल गांधी विदेशात जाऊन लोकशाहीचे धिंडवडे काढतात. भाजपने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात विकास केला आहे. गोव्यात पेडणे ते काणकोण पर्यंत पुर्णत्वास आलेले प्रकल्प विविध भागात जाऊन जन संपर्क साधून जनतेपुढे ठेवणे व त्याचे वर्णन करणे हे विकास तीर्थयात्रेच उदिष्ट आहे असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.

'पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या कारकीर्दीची पुस्तिका भेट देवून लोकांना मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सुशासन, लोकांच्या डोळ्यासमोर ठेवायचा हा प्रयत्न आहे. भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार परत एकदा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली येईल यात शंकाच नाही. 2014 च्या निवडणूकीत गोव्यात दोन्ही जागा भाजप जिंकणार हे नक्की" असा विश्वास यावेळी तानावडे यांनी व्यक्त केला.

'संपर्क से समर्थन' या कार्यक्रमातून आम्हाला प्रचिती आली आहे की जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे. सगळे गोवेकर मोदी यांच्या समर्थनात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा संपूर्ण देशात वाहत आहे. राष्ट्र प्रथम ही पॉलीसी घेऊन भाजप सरकार पुढे जात आहे असे वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी सांगितले.

"लोकशाहीत कुणीही कुणाशीही संपर्क करू शकतो यावर बंधन नाही. भाजप सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोव्याच्या विकासाबरोबर संपूर्ण देशाचा विकास केला आहे. तसेच जो कोण विकास करतो, त्याला सत्तेवर येण्यापासून कोणी रोखू शकत नाही."

"मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात व गोव्यात झालेला विकास कार्यकर्त्यांनी स्वत: हून पाहून नंतर लोकांपर्यत पोचवण्याचा हा एक कार्यक्रम आहे. या विकास तीर्थ यात्रेतून फिर एक बार मोदी सरकार हा नारा असणार असल्याचे" मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT