BJP Loss in Karnataka Dainik Gomantak
गोवा

BJP Loss in Karnataka: आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे काम न केल्याने कर्नाटकात भाजप अपयशी; सी.टी. रवींचे विधान

भाजपच्या अपयशाची अनेक कारणे

Kavya Powar

BJP Loss in Karnataka: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या पराभवानंतर देशभरातील पक्षाच्या प्रतिमेला चांगलाच धक्का पोहोचला आहे.

याबाबतच आज भाजपतर्फे घेण्यात आलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भाजपा गोवा प्रभारी सी.टी. रवी यांनी यावर भाष्य केले आहे.

आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे काम केले नसल्यामुळे हे अपयश आले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कर्नाटकात भाजपच्या अपयशाची अनेक कारणे..

यावेळी गोवा प्रभारी सी.टी. रवी म्हणाले की, कर्नाटकात भाजपला विजयाचा विश्वास असताना आलेले अपयश हे नक्कीच धक्कादायक होते. याची अनेक कारणे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: सहभागी होत निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली होती.

आम्ही नरेंद्र मोदी यांच्यासारखे काम करू शकलो नाही, त्यामुळेच आम्ही अपयशी झालो आहोत. आमची ही चूक आम्ही मान्य केली आहे. आता या अपयशाची पोकळी पुढे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भरून काढण्यासाठी आणि प्रयत्नशील आहोत.

C T Ravi

ते पुढे म्हणाले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप 350 हून अधिक जागा जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे. या सभेवेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे तसेच भाजपचे सरचिटणीस दामू नाईक, इ उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

SCROLL FOR NEXT