bjp.jpg
bjp.jpg 
गोवा

''गोमंतकीयांना स्वतःच्या मालकीचे घर घेण्यापासून भाजप वंचित ठेवतय''

दैनिक गोमंतक

75 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या मालमत्तांच्या (property) खरेदीसाठी नोंदणी (Registration fee) फी वाढवल्याबद्दल आम आदमी पक्षाने भाजप (BJP) सरकार (Government) वर टीका केली आहे.गोवेकरांना स्वतःच्या घराच्या मालकी हक्कापासून परावृत्त करण्यासाठी भाजप सक्रियपणे प्रयत्न करीत असल्याचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे (Rahul Mhambre & Associates) यांनी सांगितले. ते म्हणाले की, बहुतेक गोमंतकीयांना त्यांच्या पहिल्या घरासाठी गुंतवणूक करायची किंवा त्यांच्या व्यवसायासाठी छोट्या व्यावसायिक जागा खरेदी करावयाच्या आहेत, त्यासाठी साधारण रु 75 लाख खर्च केला जातो.(BJP is depriving  citizen of goa from owning their own houses)

“उद्योग संस्था क्रेडाई यांनी उघडपणे सांगितले आहे की राज्य सरकारच्या (state government) भ्रष्टाचारामुळे रिअल इस्टेटच्या खर्चामध्ये 80 % वाढ होते. प्रोजेक्ट पूर्णपणे कायद्यानुसार असेल तरीही प्रत्येक परवानगी आणि मंजुरीसाठी लाच देण्याची आवश्यकता असते.वाळू आणि मुरूम-दगड काढणे हा व्यवसाय भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे.  मुख्यमंत्री डॉ सावंत (Pramod sawant) हे भ्रष्टाचार (Corruption) कमी करणार नाहीत कारण त्यांच्या पक्षाचा आणि आमदारांची पैशांची भूक त्यांना पूर्ण करायची आहे. पण सामान्य गोमंतकियांवर करांचे अधिक ओझे टाकण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी एकदाही विचार केला नाही.

मुद्रांक शुल्क आणि नोंदणी दर सहसा अर्थसंकल्पाच्या वेळी ठरविले जातात असे सांगत म्हांबरे म्हणाले की, सदर दर वाढविण्याचा निर्णय घेण्याची वेळ शंकास्पद आहे.“अलिकडच्या अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधावरील  कर कमी करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.  परंतु नोंदणी फी वाढविण्याचा हा अचानक घेतलेला निर्णय म्हणजे यू टर्न होय.कायदा मंत्री काब्राल आणि मुख्यमंत्री डॉ सावंत यांना बाजारातील गतिमानतेची माहिती नाही.  कर वाढविणे म्हणजे नेहमीच महसुलात वाढ होत नाही, तर रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात प्रतिकूल परिणामकारक ठरू शकतात ”, असे म्हाम्बरे म्हणाले.

रिअल इस्टेटमधील मागणीला चालना मिळावी यासाठी दिल्लीतील (Delhi) आप सरकारने मालमत्ता नोंदणीसाठी सर्कल दर कमी केले असून शेजारच्या महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) नोंदणी शुल्क कमी केले असल्याची माहिती म्हांबरे यांनी दिली.“आम्ही मुख्यमंत्र्यांनी कोविडशी संबंधित नुकसान भरपाई आणि आर्थिक सवलतींबद्दलच्या अनेक घोषणा ऐकल्या, पण अद्याप एकही गोमंतकीयाला एक रुपयाही मिळालेला नाही.मुख्यमंत्री सावंत यांनी वाढीव कराच्या स्वरुपात गोवेकरांकडून अधिक पैसे घेण्याचे काम निर्लज्ज पणे केले आहे, असा आरोप श्री म्हाम्बरे यांनी लावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT