Pallavi Dempo And Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

South Goa Counting: दक्षिण गोव्यात विरियातो विजयाच्या उंबरठ्यावर, भाजपने केली फेर मतमोजणीची मागणी

BJP Demand Recounting In South Goa: दक्षिणेत विरियातो यांना 2,15,672 तर पल्लवी धेंपे यांना 2,00,969 मते मिळाली आहेत.

Pramod Yadav

BJP Demand Recounting In South Goa

सगळ्या गोव्याचे लक्ष लागून राहिलेल्या दक्षिण गोव्यात भाजपसाठी धक्कादायक निकाल समोर येत असून, काँग्रेस उमेदवार विरियातो विजयाच्या उबरठ्यावर पोहोचले आहेत. विरियातो यांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम असून, धेंपे पिछाडीवर आहेत.

पण, निकालाने हादरलेल्या भाजपने दक्षिण गोव्यात फेरमतमोजणीची मागणी केली आहे.

आघाडीवर असणाऱ्या विरियातो यांच्यासह काँग्रेस व घटक पक्षाच्या नेत्यांनी मोठा जल्लोष केला. विरियातो यांनी यावेळी विजय सरदेसाई, वेंझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा यांचे आभार मानले आहेत. याशिवाय त्यांनी सर्व गोंयकारांचे देखील आभार मानले आहेत.

आज पाच पांडवांनी कौरवांचा पराभव केलाय, आजचा विजय मनी पावर विरोधात लोकांचा विजय असल्याचे विरियातो म्हणाले. तर, भ्रष्ट सरकार आणि पक्षांतराच्या विरोधात हे मतदान झाल्याचे मत गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.

दक्षिणेत मोदींनी सभा घेतली मात्र या उमेदवाराचा पराभव झाला आहे. हा मोदींचा नैतिक पराभव असल्याचा उल्लेख देखील विरियातो यांनी केला. मनी पॉवरचा पीपल पॉवरने पराभव केल्याचे विरियातो म्हणाले.

भाजपने पल्लवी धेंपे यांना उमेदवारी जाहीर करत सर्वात जास्त लक्ष याच जागेवर दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील दक्षिणेतच घेण्यात आली होती. मोदींना विरियातो आणि काँग्रेसवर सडकून टीका करत धेंपे यांना मतदान करण्याची मागणी केली. दरम्यान, भाजपने मोठी ताकद लावत धेंपेंचा प्रचार केला होता.

पण, दक्षिणेत अल्पसंख्याक मतदारांचा जलवा दिसून आला आहे. याचा सर्वाधिक फायदा विरियातो यांना झाल्याचे आकडेवारीतून दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

Vasco Khariwada: खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्री ठप्प! ग्राहकांत नाराजी; मार्केटातील विक्रेते आक्रमक, पोलिस तैनात

Goa Accidental Death: 192 दिवसांत 143 मृत्‍यू! गोव्यात नेमकं चाललंय काय? 45% बळी युवावर्गाचे

SCROLL FOR NEXT