Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'गोव्यातील जनतेला विरोधी पक्षांची आघाडी हवी आहे', विरियातोंचा दावा; केजरीवालांची कॉंग्रेसवरील टीका मात्र अनाकलनीय

Viriato Fernandes: विरियातो म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी विरोधकांची आघाडी असावी, असे जनतेला वाटत असल्याचे दिसून आले. परंतु हरियाणा, पंजाब आणि दिल्लीत आम आदमी पक्षाने आघाडी मोडली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: भाजपला पराभूत करण्यासाठी गोव्यातील जनतेला विरोधी पक्षांची आघाडी झालेली हवी आहे. राज्यातील वातावरण पूर्ण दूषित झालेले आहे आणि राजकारण ज्या पद्धतीने चालू आहे तेही वाईट मार्गाने सुरू आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी सर्वपक्षीय आघाडीची गरज असल्याचे लोकांना वाटत आहे.

परंतु अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात येताच काँग्रेसवर टीका केली, त्याचे कारण समजू शकले नाही, असे मत काँग्रेसचे दक्षिण गोवा खासदार विरियातो फर्नांडिस यांनी व्यक्त केले.

स्थानिक खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. विरियातो म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी विरोधकांची आघाडी असावी, असे जनतेला वाटत असल्याचे दिसून आले.

परंतु हरियाणा, पंजाब आणि दिल्लीत आम आदमी पक्षाने आघाडी मोडली. तरीही आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल हे गोव्यात येऊन जे काही बोलले, त्याप्रमाणे काँग्रेसकडून, असे काही मत व्यक्त झालेले नाही. हरयाणातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-आपच्या जागा निश्चितही झाल्या पण दारू घोटाळ्यातून ते बाहेर पडताच त्यांनी आघाडी तोडली.

लोकसभेच्या गोव्यातील निवडणुकीनंतर तात्काळ जिल्हा पंचायतीची पोट निवडणूक झाली तेव्हा आम्ही त्यांच्या उमेदवाराचा प्रचार केल्याची आठवण सांगत विरियातो सांगतात, केजरीवाल यांनी गोव्यात येऊन काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षकांवर टीका केली. केजरीवाल यांनी पाटकरांवर केलेली टीका एकवेळ समजू शकतो, परंतु अमित पालेकर यांनीही टीका करणे योग्य वाटले नाही,असेही ते म्हणाले.

केवळ निवडणुकीपूर्वी एकत्र नको!

केवळ निवडणुकीपूर्वी पक्ष एकत्रित येणार असतील, तर नको आहे. कारण लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा. एका विचाराने सर्व एकत्रित यावे. प्रदेशाध्यक्ष बदलाच्या या अफवा उठवल्या गेल्याचे आपणास दिसते. त्यामुळे आपलेही नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या यादीत चर्चेला आल्याने आपणासही लोकांनी अध्यक्षपद का स्वीकारत नाही, अशी विचारणा केली होती, पण आपण गोव्याच्या प्रश्नावर भांडणारे आहोत, कार्यालयात जाऊन आपण बसू शकत नाही, असे विरियातो सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT