Goa Gram panchayat Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या 186 पंचायतीपैकी 142 ग्रामपंचायतींवर भाजपचा दावा

काँग्रेस नेत्यांचे मौन: दक्षिणेत कुंकळ्ळी वगळता प्रभावहीन

दैनिक गोमन्तक

पणजी: नियोजित तारखेप्रमाणे राज्यातील 186 पंचायतीची सरपंच आणि उपसरपंचपदाची निवड आज पार पडली. यापैकी 142 पंचायतीवर आपले आणि मित्रपक्षांचे समर्थक सरपंच आणि उपसरपंच निवडून आल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला आहे. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस नेत्यांनी कोणताही दावा न करता अद्याप मौन बाळगले आहे. (BJP claims victory in 142 gram panchayats out of 186 gram panchayats of Goa)

राज्यातील 186 पंचायतीच्या 152812 ऑगस्ट रोजी झालेल्या पंचायतीच्या निवडणुकीनंतर आज सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड झाली पंचायत संचालनालयाने यासाठी सर्व पंचायतीकरीता 186 नेमणूक केली होती. बहुतांश निवडणुका बिनविरोध झाल्या असल्या तरी अनेक ठिकाणी निक प्रक्रियेद्वारे सरांच आणि उपसरपंच निवडण्यात आले.

भाजपकडून या निवडणुकीसाठी मंत्री, आमदार, माजी आमदार आणि कार्यकत्यांना सक्रिय केले हते. त्याने बहुतांश विधानसभा मतदारसंघात भाजपने जास्तीत जास्त पंचायती आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. विरोधी गटात मात्र या निवडणुकीवर अनास्था दिसून आली. अनेक ठिकाणी अपक्ष सत्ताधारी गटाच्या विरोधातील पंच सरपंच आणि उपसरपंच निवडून आले असले तरी त्यांनी भाजपला जव केल्याचे चित्र आहे. अपवाद वगळता कांग्रेस नेत्यांनी या पंचायतीची बाजू तर नाही.

72 वर्षीय महिला सरपंच!

धारबांदोडा किर्लपाल दाभाळ पंचायतीच्या सरपंचपदी श्रीमती रुक्मिणी गावकर (वय 72) यांची निवड झाली आहे. वयाने सर्वात ज्येष्ठ या श्रेणीत त्यांची गणना होत आहे, तर उपसरपंचपदी कालिदास गावकर यांची निवड झाली. सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhuipal: रात्री येत होता घरी, जबरदस्ती गाडीत बसवण्याचा केला प्रयत्न; 12 वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा डाव फसला

Water Supply Revenue: पाणी गळती, नादुरुस्त मीटर्स! सरकारला 5 कोटींचा फटका; नासाडी थांबवण्यासाठी एजन्सीची नेमणूक

Aldona: संतापजनक! हळदोण्यात पाळीव कुत्र्याच्या जबड्यावर झाडली गोळी; स्थानिकांची कारवाईची मागणी

Raibandar Fire News: रायबंदरमध्ये आगीचे थैमान! 2 दुचाकी, 4 कार जाळून खाक; लाखोंचे नुकसान

Verca Fire News: वार्का 2 स्कूटरींक उजो, Video

SCROLL FOR NEXT