गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोवा दौऱ्यावर आले आहेत. म्हापसा येथील बोडगेश्वर मैदानावर सायंकाळी जाहीर जनसंकल्पाची तयारी पूर्ण झाली. आकर्षक मंच आणि विद्युत रोषणाईमुळे परिसराला वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. गोवा विधानसभा निवडणुकांसाठी होणारे मतदान केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भाजपमुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. आधी फक्त सीजनल पर्यटन होतं, आम्ही पर्यटनाला चालना दिली आणि आता त्यामुळे 365 दिवस गोव्यात पर्यटक येतात.
जेव्हा काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा गोव्यात 25 लाख पर्य़टक यायचे आता 2019 मध्ये ही संख्या 80 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. भाजपने जेव्हा पर्य़टनावर लक्ष केंद्रित केले तेव्हा विकास झाला आहे. यामुळे गोव्यातील जनतेला पैसे आणि रोजगारही मिळायला लागला आहे. तसेच मागच्या दोन वर्षात 100 वर्षात न आलेली वैश्विक महामारी आली आणि त्यामुळे पर्यटन उद्योगाला मोठी झळ बसली. मात्र भाजपचं डबल इंजिन सरकार नसतं तर गोवा 100 टक्के लसीकरण (vaccination) झालेलं पहिलं राज्य ठरलं असतं का? त्यामुळे कुठलाही पर्यटक बिनधास्त गोव्यात येऊ लागला आणि गोव्यातील जनतेला रोजगार (Employment) मिळू लागला आहे. लसीकरणात मागे पडलो असतो तर पर्यटन (tourism) अर्थव्यवस्था कशी पुढे गेली असती? अस म्हणत त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरकारच्या कामाची स्तुती केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.