Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: भाजपा, आरएसएसने गोडसेंना मनातून काढावे अन् गांधीजींचे विचार मनात रुजवावे; अमित पाटकर

गांधीजींच्या तोंडी त्यांच्या शेवटच्या क्षणी हे राम हे शब्द होते. त्यांनी देशात खर्‍याअर्थाने रामराज्य तसेच एकोप्याने देश नांदावा यासाठी प्रयत्न केले, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले.

दैनिक गोमन्तक

Goa Congress: महात्मा गांधी हे मोठे नेते होते. अहिंसाच्या जोरावरच बापूंनी स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरात म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी गांधींचा आरएसएसचे सदस्य असलेले नथुराम गोडसेंनी गांधींची गोळ्या झाडून हत्या केली होती.

गांधीजींच्या तोंडी त्यांच्या शेवटच्या क्षणी हे राम हे शब्द होते. त्यांनी देशात खर्‍याअर्थाने रामराज्य तसेच एकोप्याने देश नांदावा यासाठी प्रयत्न केले, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले.

अमित पाटकर पुढे म्हणाले की, ज्यांच्या तोंडी नावापुरता महात्मा गांधींचे नाव आहे आणि काळजात नथुराम गोडसे यांसारखे व्यक्तिमत्व असतात, तेव्हा देशाची वाटचाल होऊच शकत नाही. आजच्या दिनी एकच अपेक्षा आहे की, भाजपा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी महात्मा गांधींचे विचार हे तोंडापूर्ता मर्यादित न ठेवता, ते मनात रुजवावे.

तसेच गोंडसे यांचे विचार बाजूला काढावे. कारण हा राष्ट्राचा व देशवासीयांचा प्रश्न आहे. तसेच गांधीजींची धोरणे पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकजूट होण्याची आवश्यकता असल्याचे पाटकर पुढे म्हणाले.

मंगळवारी (ता.३०) सकाळी, म्हापशात उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेस पदाधिकार्‍यांनी शहीद दिनानिमित्त येथे हुतात्म्यांना तसेच गांधीजींना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा, माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप, सरचिटणीस विजय भिके, वीरेंद्र शिरोडकर व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना अ‍ॅड. रमाकांत खलप म्हणाले की, महात्मा गांधी हे जागतिक किर्तीचा नेते होते. गांधींना मरणोत्तर नोबेल शांती पारितोषिक देण्याबाबत विचार झाल्यास ते अयोग्य ठरणार नाही. सध्या देशाला गांधीजींच्या विचारांची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, आगामी लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पक्षाने अर्ज मागविलेत. अशावेळी मी सध्या हिंतचिंतक व स्नेहींकडून सल्लामसलत करत आहे. तसेच, काँग्रेस पक्षाने कठोर निर्णय घेत, सर्वमान्य उमेदवार निवडावा, असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी काँग्रेस पक्षाला यावेळी दिला.

काँग्रेसने इच्छुकांसाठी येत्या ५ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. सध्या मी नेत्यांकडून तसेच पक्षातील सर्व आघाडींकडे विचारविनिमय करतोय. सर्वांकडून सल्लामसलत व चर्चेनंतरच मी निवडणूक लढवायची की नाही याविषयी अंतिम निर्णय घेईन. जर पक्षाकडून संधी मिळाल्यास मी निवडणूक नक्की लढीन, असे स्पष्टीकरण अ‍ॅड. खलप यांनी यावेळी दिले.

तसेच लोकसभेच्या उमेदवारीबाबत बोलताना आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा म्हणाले की, लोकसभेसाठी काँग्रेस पक्ष कामाला लागला असून, लोकभावना लक्षात घेऊन आम्ही उमेदवार उभा करणार आहोत. काँग्रेसकडे देखील इतर राजकीय पक्षाप्रमाणे अनेक इच्छुक आहेत. यात गैर काहीच नसते. या दोन्ही जागा पक्षासाठी महत्त्वाच्या असून आम्ही उत्तर व दक्षिण गोवा जिंकू असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.

सरकारने सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सरच्या माध्यमातून सरकारच्या कामांबाबत जागृती करण्याचा निर्णय घेतलाय. मुळात, सरकार करदात्यांचा पैशांचा अशाप्रकारे चुराडा का करु पाहते. सध्या व्हॉट्स अ‍ॅप युर्निव्हर्सिटी सुरू आहेत. यातून चूकीच्या माहिती पुरविल्या जातात. आणि या कामासाठी सरकार असे करु पाहते का?

असे म्हणत अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी सरकारवर सडकून टीका केली. सरकारला स्वतःची उपलब्धी सांगायची असल्यास ती त्यांनी स्वतः सांगावी. सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर कशाला हवेत. दुसरीकडे, सरकार म्हणते की इन्फ्ल्यूएन्सर हे गोव्याची बदनामी करताहेत. मग, अशांना पकडून अटक करावी.

त्याचप्रमाणे, कुठल्याही स्थितीत मी काँग्रेस सोडणार नसून, इतरही काँग्रेस आमदार हे पक्षाशी एकनिष्ठ आहेत. जरी मी एकच आमदार म्हणून राहिलो तरीही काँग्रेसोबतच राहणार असेही फेरेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT