Goa Loksabha Election RGP Dainik Gomantak
गोवा

Goa RGP: काँग्रेस, भाजप 'आरजी'ला घाबरलेत; सिक्वेरा जपिंग फ्रॉग, त्यांच वय झालंय - वीरेश, रुबर्ट आक्रमक

Goa Loksabha Election RGP: पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या आरजीने भाजप आणि काँग्रेसवर टीका करत काँग्रेस, भाजप 'आरजी'ला घाबरले असल्याचे म्हटले आहे.

Pramod Yadav

Goa Loksabha Election RGP

गोव्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, राज्यात त्रिशंकू लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात काँग्रेस, भाजप आणि रिव्हॉल्युशनरी गोवन् (आरजी) हे तीन पक्ष एकमेकांसमोर असतील. राज्यातील गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) इंडिया आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचार करताना दिसतील.

दरम्यान, राज्यात आता राजकीय टीका टिप्पणीला सुरुवात झाली असून, पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या आरजीने भाजप आणि काँग्रेसवर टीका करत काँग्रेस, भाजप 'आरजी'ला घाबरले असल्याचे म्हटले आहे.

'काँग्रेस आणि भाजप दोन्ही रिव्हॉल्युशनरी गोवन् (आरजी) पक्षाला घाबरले आहेत. आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे आरजीला दोघेही एकमेकांची बी टीम म्हणून सांगतात,' असे आरजीचे आमदार वीरेश बोरकर म्हणाले.

'लोकसभेत 33 टक्के खासदार प्रादेशिक पक्षाच्या तिकिटावर निवडून जातात. बेडकासारखे उड्या मारणारे आलेक्स सिक्वेरा यांनी ही आकडेवारी लक्षात ठेवावी, सिक्वेरा यांचे वय झाले असून, त्यांची स्मृती कमी होत चालली आहे.'

'सिक्वेरा यांनी राजीनामा देऊन नुवे येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी आणि विजयी होऊन दाखवावे,' अशा शब्दात आरजीचे दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार रुबर्ट परेरा यांनी सिक्वेरा यांच्यावर टीका करत त्यांना आव्हान दिले.

गोव्यात लोकसभा निवडणुकीत रिव्हॉल्युशनरी गोवन् मते फोडण्याचे काम करेल अशा, शब्दात काँग्रेसच्या वतीने टीका करण्यात आली होती. गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी आरजी भाजपची बी - टीम असल्याचा उल्लेख केला होता.

इंडिया आघाडीचा घटक असलेल्या आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक अमित पालेकर देखील आरजीविरोधात टीका करताना दिसले. एकेकाळी पक्षाकडे निधी नव्हता तो पक्ष अचानक लोकसभा लढविण्यास तयार झाला, जनतेला सर्व कळते, अशा शब्दात पालेकर यांनी भूमिका मांडली होती.

दरम्यान, याचवेळी आरजीसोबत चर्चेची तयारी दर्शवत त्यांच्यासाठी दरवाजे खुले असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT