Fourth death BITS Pilani Goa Dainik Gomantak
गोवा

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

BITS Pilani Goa Student Death: गेल्या वर्षभरात कॅम्पसवर घडलेली ही चौथी, तर चार महिन्यांतील दुसरी दुर्दैवी घटना असल्याने कॅम्पसवर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे

Akshata Chhatre

BITS Pilani Fourth Death Case: गोव्यातील प्रतिष्ठित बिट्स पिलानी, के.के. बिर्ला कॅम्पसवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. शनिवारी (१६ ऑगस्ट) कॅम्पसवरील एका तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. विद्यार्थी झोपेत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे कॉलेज प्रशासनाने म्हटले आहे. गेल्या वर्षभरात कॅम्पसवर घडलेली ही चौथी, तर चार महिन्यांतील दुसरी दुर्दैवी घटना असल्याने कॅम्पसवर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

काय आहे नेमकी घटना?

उत्तर प्रदेशचा मूळ रहिवासी असलेला कुशाग्र जैन हा इकॉनॉमिक्स आणि कॉम्प्युटर सायन्सचा तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. शैक्षणिकदृष्ट्या कुशाग्र अत्यंत हुशार होता आणि त्याचे सीजीपीए (CGPA) ९ च्या जवळ होते. शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजता त्याचा खोलीचा दरवाजा उघडला असता तो अंथरुणावर प्रतिसाद देत नसल्याचे आढळून आले. तातडीने वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले, मात्र तपासणीनंतर त्याचा झोपेतच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

प्रशासनाची भूमिका

या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली असून, त्यांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. 'बिट्स गोवा कॅम्पसचे चीफ मॅनेजर, जनसंपर्क' अर्जुन सी. हळर्णकर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "एका तरुण विद्यार्थ्याचा अकाली मृत्यू ही एक कधीही भरून न येणारी शोकांतिका आहे.

या घटनेमुळे संपूर्ण कॅम्पस समुदाय दु:खी आणि हादरला आहे." या दुर्दैवी प्रसंगात कुशाग्रच्या कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत आणि कॅम्पसमधील प्रत्येकासोबत आहोत, असेही त्यांनी सांगितले. प्रशासनाकडून पोलिसांना पूर्ण सहकार्य केले जात आहे.

मागील घटनांची मालिका

गेल्या वर्षभरात कॅम्पसवर घडलेली ही चौथी घटना आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये ओम प्रियन सिंग, मार्च २०२५ मध्ये अथर्व देसाई आणि मे २०२५ मध्ये कृष्णा कसेरा या विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला होता. या घटनांची मालिका पाहता विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT