BITS Pilani K K Birla Goa Campus Dainik Gomantak
गोवा

BITS गोवा आयोजित करणार 'वेव्हज 2023' फेस्टिव्हल; बॉलीवूड नाईटसाठी येणार संगीतकार अमित त्रिवेदी

स्टँड अप कॉमेडियन अभिषेक उपमन्यु, 'व्हेन चाय मेट टोस्ट' अ‍ॅक्टचीही उत्सुकता

Akshay Nirmale

BITS Goa Waves 2023 Festival: बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (BITS) गोवातर्फे यंदाच्या 'वेव्हज 2023' या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे.

या फेस्टिव्हलमधील बॉलीवूड नाईट कार्यक्रमासाठी संगीतकार अमित त्रिवेदी येणार आहे. तर गोवा इंडि नाईटसाठी हेडलाईन अ‍ॅक्ट म्हणून 'व्हेन चाय मेट टोस्ट' असणार आहे.

'वेव्ज' हा BITS पिलानी, केके बिर्ला गोवा कॅम्पसचा वार्षिक तीन दिवसांचा सांस्कृतिक महोत्सव आहे. तो यंदा 27, 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी आयोजित केला जाणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात कॉमेडी नाईटने होईल. सुप्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन अभिषेक उपमन्यू यात असणार आहे. त्याच दिवशी, BITS गोवा इंडी नाईटसाठी हेडलाइनिंग अ‍ॅक्ट म्हणून 'व्हेन चाय मेट टोस्ट' देखील सादर होणार आहे.

तसेच अमित त्रिवेदी एका बॉलीवूड नाईटसाठी उपस्थित राहणार आहे. संस्था या सांस्कृतिक महोत्सवातील इतर कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. त्यात मिस्टर अँड मिस वेव्हज, नाट्यांजली, फॅशन परेड आणि सीरॉक असे कार्यक्रम या तीन दिवसांत होणार आहेत.

BITS चा हा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव सामान्यतः ऑक्टोबरच्या उत्तरार्धात किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या काळात आयोजित केला जातो. या सांस्कृतिक महोत्सवात संगीत, नृत्य आणि इतर कलांचे कार्यक्रम असतात.

बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी (राजस्थान) चा गोवा कॅम्पस हे गोव्यातील BITS पिलानीच्या पाच घटक कॅम्पसपैकी एक आहे. BITS गोवा ची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT