Goa Research Ai Image Generator
गोवा

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

3D Printed Skin Tissue: झुआरीनगर येथील बिर्ला तंत्रज्ञान व विज्ञान संस्थेच्या गोवा केंद्रातील संशोधकांनी औषधनिर्मितीत वापरल्या जाणाऱ्या घटकांपासून त्रिमितीय छपाईसाठी विशेष द्रव्य विकसित केले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: झुआरीनगर येथील बिर्ला तंत्रज्ञान व विज्ञान संस्थेच्या गोवा केंद्रातील संशोधकांनी औषधनिर्मितीत वापरल्या जाणाऱ्या घटकांपासून त्रिमितीय छपाईसाठी विशेष द्रव्य विकसित केले आहे. या द्रव्याचा उपयोग त्वचेच्या ऊतींची निर्मिती तसेच रुग्णाच्या गरजेनुसार औषध देण्यासाठी करता येण्याची शक्यता आहे.

या संशोधनासाठी स्टार्च, माल्टोडेक्स्ट्रिन आणि सोडियम अल्जिनेट यांसारख्या औषधनिर्मितीच्या दर्जाच्या घटकांचा वापर करून विशेष जलजेल तयार करण्यात आले. हे जलजेल त्रिमितीय छपाईदरम्यान सहज वाहते आणि छपाई पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपली रचना टिकवून ठेवते. त्यामुळे तयार झालेल्या रचनेचा आकार आणि मजबुती कायम राहण्यास मदत होते. प्रयोगात या जलजेलने ८७ टक्के रचनात्मक पुनर्प्राप्ती दर्शविली.

संशोधकांनी जलजेलची जैविक सुसंगतताही तपासली. त्वचेच्या ऊतींच्या अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन प्रकारच्या पेशींवर प्रयोग करण्यात आला. त्यामध्ये ७० टक्क्यांहून अधिक पेशी जिवंत राहिल्याचे आढळले. तसेच रक्ताशी सुसंगततेची चाचणी घेतली असता रक्तपेशींचे नुकसान केवळ पाच टक्के असल्याचे दिसून आले. सूक्ष्मदर्शकीय तपासणीत जलजेलवर पेशींची वाढ होत असल्याचेही स्पष्ट झाले.

या संशोधनाचा औषधनिर्मितीसाठीही प्रयोग करण्यात आला. संशोधकांनी जलजेलमध्ये ग्लिमेपिराइड हे औषध मिसळून त्रिमितीय पद्धतीने चघळण्याच्या गोळ्या तयार केल्या. या गोळ्यांमध्ये औषधाचे प्रमाण १००.४ टक्के एकसमान असल्याचे आढळले. विशेष म्हणजे या गोळ्यांनी औषध चार तासांच्या कालावधीत हळूहळू सोडण्याची क्षमता दर्शविली. त्यामुळे भविष्यात रुग्णाच्या विशिष्ट उपचार गरजेनुसार औषधाची मात्रा, आकार आणि रचना बदलून गोळ्या तयार करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

या संशोधनाचे नेतृत्व जैविक विज्ञान विभागाच्या प्रा. अनसुया गांगुली यांनी केले. हेमंतकुमार बँकहेडे, महेश्वरी सिवारावी, अंतरा पै रायतूरकर आणि प्राजक्ता भेंडे यांनी त्यांना सहकार्य केले. रासायनिक अभियांत्रिकी विभागाच्या प्रा. असिमा शौकत, ममता तारी आणि सागर काळे यांचाही संशोधनात सहभाग होता.

संशोधन सध्या प्रयोगाच्या टप्प्यावर...

विशेष म्हणजे या प्रयोगात प्रामुख्याने औषधनिर्मितीत आधीपासून वापरल्या जाणाऱ्या घटकांचा आधार घेण्यात आला आहे. त्यामुळे जैविक छपाईसाठी विशेष किंवा प्राणिजन्य पदार्थांवरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे.

सुरक्षितता, छपाईची क्षमता आणि प्रत्यक्ष उपयोग या तिन्ही बाबी एकत्र आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. मात्र, हे संशोधन सध्या प्रयोगाच्या टप्प्यावर असून त्याला वैद्यकीय उपचार म्हणून मान्यता मिळालेली नाही. प्रत्यक्ष रुग्णोपचारात वापरासाठी पुढील संशोधन, चाचण्या आणि आवश्यक नियामक मान्यता पूर्ण करावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

SCROLL FOR NEXT