Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim: डिचोलीत गव्यांचा धुमाकूळ! ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण, बागायती पिकांची मोठी नासधूस

Bison in Goa: डिचोलीतील ‘गोठण’ परिसरात पुन्हा एकदा गव्यांचा संचार वाढला असून, शुक्रवारी ‘गोठण’ परिसरातील भर रस्त्याजवळ गव्यांचा एक कळप संचार करीत होता

Sameer Amunekar

डिचोली: डिचोलीतील ‘गोठण’ परिसरात पुन्हा एकदा गव्यांचा संचार वाढला असून, शुक्रवारी ‘गोठण’ परिसरातील भर रस्त्याजवळ गव्यांचा एक कळप संचार करीत होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. गव्यांचा पुन्हा संचार वाढल्याने ‘गोठण’ भागातून ये-जा करणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे.

शुक्रवारी सहा ते सात गवे ‘गोठण’ येथे मुख्य रस्त्यावरून जंगलाच्या दिशेने गेल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती कृष्णानगर भागात राहणारे पापुराज मयेकर यांनी दिली.

या गव्यांनी परिसरात सध्या उच्छाद मांडला असून, बागायती पिकांची नासधूस सुरु केली आहे. लोकवस्तीजवळच कळपाने गवे संचार करीत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. बागायतदारही चिंतेत आहेत.

गव्यांच्या दहशतीमुळे लोकही रात्रीच्यावेळी घराबाहेर पडण्याचे धाडस करीत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार किमान सहा ते सात गवे कळपाने या परिसरात मुक्तपणे संचार करीत आहेत.

गव्यांची दहशत वाढण्यापूर्वीच वन खात्याने या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेकडून होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून गोठण, लाखेरे भागात गव्यांचा संचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

जंगल सोडून गवे लोकवस्त्यांजवळ येण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे घाट वा डोंगराळ परिसरात त्यांना खाद्य मिळणे दुरापास्त झाले आहे. खाद्याच्या शोधार्थ गव्यांनी आपला मोर्चा लोकवस्त्यांजवळ वळवला आहे. बहुतेक ग्रामीण भागात गव्यांचे अस्तित्व जाणवत आहे. - अमृत सिंग, प्राणीमित्र.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खूर्च्या उचण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly Session Live: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर!

Goa News: ऐतिहासिक! 1972 पूर्वी अभयारण्यात आलेली, सर्व्हे आराखड्यावर नोंद असलेली एक लाख घरे कायदेशीर होणार, 1 ऑगस्टपासून प्रक्रिया

New Dress Code: हाफ-स्लीव्ह, लेगिंग्सला बंदी! भारताशेजारील 'या' देशात महिला-मुलींसाठी नवा ड्रेस कोड; तालिबानी फतवा जारी

SCROLL FOR NEXT