Birsa Munda Jayanti Margao Dainik Gomantak
गोवा

Birsa Munda Jayanti: मडगावात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन! बिरसा मुंडा यांच्‍या 150व्‍या जयंतीनिमित्त 10 हजार दुचाकीस्वार होणार सहभागी

Birsa Munda Jayanti Margao Rally: भगवान बिरसा मुंडा यांच्‍या १५० व्‍या जयंती वर्षानिमित्त आयोजिलेल्‍या जनजातीय गौरव अभियानाची , शनिवारी सांगता होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: भगवान बिरसा मुंडा यांच्‍या १५० व्‍या जयंती वर्षानिमित्त आयोजिलेल्‍या जनजातीय गौरव अभियानाची , शनिवारी सांगता होणार आहे. यानिमित्त मडगावात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन केले असून यामध्ये तब्‍बल १० हजार दुचाकीस्वार सहभागी होणार आहेत.

रॅलीची सांगता मडगावच्‍या एसजीपीडीए मैदानात होणार असून यानिमित्त सुमारे २५ हजार युवक एकत्र येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ३१ ऑक्‍टोबर रोजी गावडोंगरी-काणकोण येथे झालेल्‍या जनजातीय सांस्‍कृतिक मेळाव्‍यातून या अभियानाची सुरुवात झाली होती.

त्‍यानंतर काणकोण, सावर्डे, केपे, कुडचडे, जुने गोवे, तिसवाडी, साखळी, मडगाव, धारबांदोडा, फोंडा, आमोणे अशा वेगवेगळ्‍या ठिकाणी कार्यक्रम सुरू होते. या प्रत्‍येक कार्यक्रमाला लोकांची प्रचंड गर्दी होती. काल काणकोण येथे झालेल्‍या शोभायात्रेत हजारो कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. माजी केंद्रीय राज्‍य आरोग्‍यमंत्री डॉ. भारती पाटील यांच्‍या उपस्‍थितीत झालेल्‍या या शोभायात्रेत सुमारे ४ हजार महिलांनी भाग घेतला होता.

एसजीपीडीए मैदानावर महासंमेलन

मंत्री रमेश तवडकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली हा कार्यक्रम होणार आहे. हजारोंच्या संख्येने एखाद्या रॅलीत युवकांचा सहभाग असणे, ही गोव्‍यातील पहिलीच वेळ असेल. बाराही तालुक्यांमधून युवक मिरवणुकांसह मडगावात दाखल हाेतील. शनिवारी दुपारी ३ वाजता एसजीपीडीए मैदानावर या युवकांचे भव्य महासंमेलनहोणार आहे.

उद्याचा मेळावा हा अभूतपूर्व असेल. गोव्‍यात पहिल्‍यांदाच हजारो युवकांचा सहभाग असलेली दुचाकींची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. तरुणांचा उत्साह पाहून मी आनंदीत आहे. राज्यात वेगवेगळ्‍या भागांतून ही रॅली सुरू हाेणार असून मडगावात सांगता होईल.

- रमेश तवडकर, आदिवासी कल्‍याण मंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sandpapergate Scandal: 'उस्मान ख्वाजा सर्वात मोठा गद्दार', सँडपेपरगेट प्रकरणावरुन डिव्हिलियर्सचा संताप; क्रिकेटची बदनामी केल्याचा आरोप

Goa Spice Cultivation: जायफळ, वेलची, काळी मिरीला बाजारात मागणी; गोव्यात मसाला पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Accident News: दोन महिन्यांपूर्वी घेतली कार, 100च्या स्पीडमध्ये 20 फूट हवेत उडून झाडावर आदळली… भीषण अपघातात 7 तरुणांचा मृत्यू

Mohammed Siraj Selection: मोहम्मद सिराजला प्लेइंग-11 मधून वगळण्यावरुन राजकीय वादंग! काँग्रेस नेत्याने तोडले तारे; म्हणाले, 'नावामुळे भेदभाव...' VIDEO

Under 16 Cricket: गोव्याचा पहिला डाव 97 धावांत आटोपला; कर्नाटकने पहिल्याच दिवशी 127 धावांची आघाडी घेत वर्चस्व गाजवले

SCROLL FOR NEXT