Bird Conservation :
पणजी, गोव्यात अलीकडच्या काळात अनेक पर्यटक, निसर्गप्रेमी, पक्षीनिरीक्षक आणि संशोधन अभ्यासक आदी पक्षीनिरीक्षण उपक्रमात सहभाग घेत आहेत. हा उपक्रम पक्ष्यांच्या संवर्धनासाठी तसेच पक्ष्यांच्या, वृक्षांच्या प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे पक्षीनिरीक्षकांचे मत आहे.
याबाबत पक्षीअभ्यासक जलमेश कारापूरकर म्हणाले की, अलीकडच्या काळात गोव्यात पक्षीनिरीक्षणासाठी येणारे विदेशी पर्यटक तसेच पक्षीनिरीक्षकांची संख्या वाढली आहे. गोव्यात पक्षीनिरीक्षण उपक्रमाबाबत अधिक जागरूकता निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे पक्षी, वनस्पती, वृक्ष प्रजातींचे संवर्धन होण्यास मदत होईल. यामुळे पक्ष्यांचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यास मदत होईल.
पर्यावरण तथा पक्षीअभ्यासक डॉ. प्रणॉय बैद्य यांनी सांगितले की, गोव्यात बरेच पक्षीनिरीक्षक आणि पर्यावरणवादी आहेत, जे बऱ्याचदा पक्षीनिरीक्षणाच्या क्रियाकलापात सहभागी होतात. परदेशी पक्षीनिरीक्षकही गोव्यात येत आहेत.
पर्यटनाच्या दृष्टीने हा उपक्रम लोकप्रिय होतोय. आता पक्षीनिरीक्षणाचा ट्रेंड आहे आणि अनेक संशोधक, अभ्यासक, प्राणीशास्त्रज्ञ, निसर्गप्रेमी विविध पक्ष्यांच्या प्रजातींचा अभ्यास करण्यात सक्रिय सहभाग घेत आहेत.
पक्षी निरीक्षणाचा ट्रेंड बदललाय : परब रांगणेकर
गोव्यात अनेक दशकांपासून पक्षीनिरीक्षणाचा उपक्रम सुरू आहे. २००० पासून अनेक परदेशी पर्यटक आणि गोवावासीयांनी या उपक्रमात सहभाग घ्यायला सुरूवात केली. सध्या हा ट्रेंड खूप बदलला आहे.
अनेक भारतीय पक्षीनिरीक्षक, संशोधन अभ्यासक, प्राणीशास्त्रज्ञ, निसर्गप्रेमी पक्षी निरीक्षणाच्या ट्रेल्समध्ये सहभाग घेतात. बोंडला, तांबडी सुर्ल, आगशी, कुडतरी आणि इतर काही नियुक्त क्षेत्रे आहेत, जिथे लोक पक्षीनिरीक्षणासाठी मोठ्या उमेदीने जातात, असे पक्षीनिरीक्षक परब रांगणेकर यांनी सांगितले.
गोव्यात पक्षीनिरीक्षण उपक्रमाबाबत अधिक जागरूकता निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे पक्षी, वनस्पती, वृक्ष प्रजातींचे संवर्धन होण्यास मदत होईल. पक्ष्यांचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल.
- जलमेश कारापूरकर, पक्षीअभ्यासक
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.