Fake NOC Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंचा पर्दाफाश! दिल्ली पोलिसांच्या नावे तयार केली बनावट NOC; नवीन FIR दाखल होण्याची शक्यता

Luthra Brothers Case: या बनावटगिरीमुळे संशयितांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, त्यांच्यावर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Akshata Chhatre

Goa nightclub fire update: हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीच्या तपासादरम्यान हणजूण पोलिसांनी लुथरा बंधूंच्या विरोधात नवे आणि गंभीर पुरावे शोधून काढले आहेत. सौरव आणि गौरव लुथरा यांनी नाईट क्लबचे परवाने मिळवण्यासाठी चक्क दिल्ली पोलिसांच्या नावाने एक बनावट नाहरकत प्रमाणपत्र (NOC) तयार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

आरोग्य अधिकाऱ्याची बनावट सही

या बनावटगिरीमुळे संशयितांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, त्यांच्यावर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. केवळ दिल्ली पोलीसच नव्हे, तर कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बनावट सही करून आरोग्य परवाना मिळवल्याचा प्रकारही समोर आला आहे.

डॉ. रोशन नाझरेथ यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दिली असून, त्यांच्या नावाचा गैरवापर करून अबकारी (Excise) परवाने मिळवल्याचे तपासात निष्पन्न झालेय. अधिकार नसतानाही अशा प्रकारे बनावट कागदपत्रे तयार करणे हा प्रशासकीय व्यवस्थेला दिलेला मोठा धक्का मानला जात आहे.

पोलीस कोठडीत २६ डिसेंबरपर्यंत वाढ

म्हापसा न्यायालयाने लुथरा बंधूंच्या पोलीस कोठडीत २६ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. ६ डिसेंबर रोजी झालेल्या या भीषण दुर्घटनेत २५ जणांचा बळी गेला होता. या प्रकरणातील तिसरा मालक अजय गुप्ता याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये. संशयितांनी थायलंडला पळ काढला होता, मात्र त्यांना पुन्हा भारतात आणून आता त्यांचा सखोल तपास सुरू आहे.

अंमलबजावणीतील त्रुटींवर बोट

तपास अधिकाऱ्यांच्या मते, हे बनावट दस्तऐवज केवळ दिशाभूल करण्यासाठीच नव्हे, तर कायदेशीर पळवाटा शोधण्यासाठी तयार करण्यात आले होते. या नवीन खुलाशामुळे आता 'बर्च' क्लबमधील सुरक्षेच्या त्रुटींसोबतच भ्रष्टाचाराचे आणि फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: कोहलीचा 'विराट' शो फक्त टीव्हीवरच, स्टेडियममध्ये चाहत्यांना नो-एन्ट्री; 'विजय हजारे ट्रॉफी'बाबत सरकारचा मोठा निर्णय

Goa Crime: भुतेभाटमध्ये चोरीचा थरार! 5 जणांच्या टोळीचा डल्ला मारण्याचा 'प्लॅन' फसला; एकाला रंगेहात पकडलं, 4 जण पसार

Goa ZP Election: "युतीचा निर्णय झाला पण..." सरदेसाईंनी मांडली पराभवाची कारणे; '2027'साठी नव्या रणनीतीचे संकेत

VIDEO: "धोनीने माझं करिअर उद्ध्वस्त..." निवृत्तीनंतर भारतीय खेळाडूनं सोडलं मौन, 'माही'बाबत केला मोठा खुलासा

Santosh Trophy 2025: गोव्याने संधी गमावली! संतोष करंडक फुटबॉलमध्ये मुख्य फेरी हुकली; लक्षद्वीपसोबत गोलबरोबरी

SCROLL FOR NEXT