Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: 'बर्च बाय रोमिओ लेन' बनावट 'NOC' प्रकरण; मुख्य संशयित अजय गुप्ताला म्हापसा कोर्टाकडून जामीन मंजूर

Ajay Gupta: हडफडे येथील बर्च क्लब दुर्घटना प्रकरणात अडकलेल्या संशयित अजय गुप्ता याला म्हापसा येथील न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC) न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Sameer Amunekar

म्हापसा: हडफडे येथील बर्च क्लब दुर्घटना प्रकरणात अडकलेल्या संशयित अजय गुप्ता याला म्हापसा येथील न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC) न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अजय गुप्ता याच्यावर बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबसाठी अबकारी (उत्पादन शुल्क) खात्याचा परवाना मिळवताना बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा गंभीर आरोप होता.

साकवाडी-हडफडे येथील सर्व्हे क्रमांक १५९/० मधील घर क्रमांक ५०२/१ मध्ये चालणाऱ्या कंपनीच्या आस्थापनासाठी उत्पादन शुल्क परवाना मिळवण्याच्या उद्देशाने संशयितांनी समान हेतूने जाणूनबुजून कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राची एनओसी तयार केली.

आरोपानुसार, अजय गुप्तानं हे प्रमाणपत्र अधिकृतपणे मिळवण्याऐवजी आरोग्य केंद्राच्या नावाने बनावट एनओसी तयार केली. यासाठी त्यांनी केंद्राच्या अधिकृत रजिस्टरमधील नोंदींमध्ये फेरफार केला आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्याही केल्या.

संशयितांनी तयार केलेली ही बनावट कागदपत्रे अबकारी खात्याकडे सादर करण्यात आली होती. मात्र, पडताळणी दरम्यान या प्रमाणपत्रावरील स्वाक्षऱ्या आणि रजिस्टरमधील नोंदी संशयास्पद आढळल्या.

संशयितांनी समान हेतूने जाणूनबुजून फसवणूक करण्याच्या उद्देशाने हा बनाव रचला होता. यामुळे केवळ आरोग्य केंद्रच नव्हे, तर अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांचीही दिशाभूल करण्यात आली होती. अखेर अजय गुप्ताला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT