Luthra Brothers Dainik Gomantak
गोवा

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

Birch by Romeo Lane Fire Case: या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि नाईटक्लबचे मालक लुथरा बंधू अखेर गोवा पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

Manish Jadhav

पणजी: हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' या नाईटक्लबला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेने राज्यासह संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या आगीत 25 निष्पाप लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता. याचप्रकरणी आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि नाईटक्लबचे मालक लुथरा बंधू अखेर गोवा पोलिसांच्या जाळ्यात अडकले. थायलंडमधून हद्दपार केल्यानंतर काही तासांतच ते दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले, जिथे गोवा पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले.

25 जणांचा मृत्यू आणि मालकांचे पलायन

हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' या नाईटक्लबमध्ये लागलेली आग ही गोव्याच्या इतिहासातील सर्वात भीषण दुर्घटनांपैकी एक मानली जात आहे. ज्यावेळी हा नाईटक्लब आगीत भस्मसात होत होता आणि आत अडकलेले लोक जीवाच्या आकांताने ओरडत होते, त्याचवेळी या क्लवचे मालक असलेले लुथरा बंधू जबाबदारी झटकून थायलंडला पसार झाले होते. या भीषण आगीत 25 जणांना आपला जीव गमवावा लागला.

बँकॉक पोलिसांची कारवाई आणि प्रत्यार्पण

नाईटक्लबमधील सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचा ठपका ठेवत, गोवा पोलिसांनी लुथरा बंधूंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. ते परदेशात पळाल्याचे स्पष्ट होताच त्यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांना भारतात आणण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु होती.

बँकॉक पोलिसांनी लुथरा बंधूंना ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. बँकॉक विमानतळावरुन या दोघांना डिपोर्ट करतानाचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अखेर आज (16 डिसेंबर) दिल्ली विमानतळावर उतरताच गोवा पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

Goa Land Zoning: गोव्यातील सेर्नाभाटी, कोलव्यातील 12.74 लाख चौ. मीटर जमीन 'अविकासयोग्य'; सरकारची मंजुरी

Crime News: भरदिवसा सुरीने हल्ला; सूरज कसबेचा जामीन अर्ज फेटाळला, न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

SCROLL FOR NEXT