Goa Biodiversity Conservation  Dainik Gomantak
गोवा

Biodiversity Framework: गोव्याचा जैवविविधता कृती आराखडा तीन महिन्यांत तयार होण्याची शक्यता

जैवविविधता आराखड्यावर काम सुरू करणारे गोवा पहिले राज्य

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याचा जैवविविधता कृती आराखडा (Biodiversity Framework) येत्या तीन महिन्यांत तयार होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण समितीच्या International Union for Conservation of nature (IUCN) '2020 नंतरचा जागतिक जैवविविधता आराखड्यावर काम सुरू करणारे गोवा देशातील पहिले राज्य आहे. जानेवारी 2022 मध्ये या कामासाठी 45 जणांची समिती तयार करण्यात आली. येत्या तीन महिन्यात हा आराखडा तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत माहिती देताना गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य प्रदीप कदम म्हणाले. 'आपली साधनसंपत्ती आणि उपजीविका यांची सांगड घालून निसर्गाचे संवर्धन करणे अशी ही संकल्पना आहे. जसं आंबा खायला मिळतो म्हणून आंब्याच्या झाडाचे संवर्धन व संरक्षण केले जाते. अशाच पद्धतीने लोकांना निसर्गाचे संवर्धन करण्यास प्रवृत्त करण्यावर भर दिला जाईल.' विविध उपसमित्यांसाठी आयोजित एका कार्यक्रमात कदम बोलत होते.

'जैवविविधता व्यवस्थापन समिती प्रत्येक गावात ग्रामस्थांसोबत सल्लामसलत करतील. मसुदा आराखडा तयार झाल्यानंतर दक्षिण आणि उत्तर गोव्यातील नागरिकांसोबत चर्चा करून योजना तयार केली जाईल. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वतीने सर्व राज्यांना विस्तृत आराखाडा दिला असून, त्याप्रमाणे योजना तयार केली जाईल.' असे कदम यांनी नमूद केले.

गोव्याकडे असा कृती आराखडा आहे. पण तो मुख्यत्वे राज्याच्या जैवविविधतेसाठी तयार केलेला सूक्ष्म दस्तऐवज आहे. नवीन आराखडा 'निसर्ग संवर्धन प्रक्रिया आणि सहभाग' यासाठी सामान्य नागरिकांना दिशादर्शक ठरणार आहे. यामध्ये किनारपट्टी, सागरी आणि असुरक्षित परिसंस्थांच्या जैवविविधतेचे संवर्धन, ग्रामीण आणि शहरी भागांसाठी शाश्वत विकास नियोजन, हवामान बदल, पारंपारिक ज्ञान, मध्य-सपाट प्रदेश, वनक्षेत्र आणि कृषी जैवविविधता अशा प्रकरणांचा समावेश असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT