सपना सामंत
Bimbal Sattari Goa Mahaganpati Tempal: सत्तरी ही देवदेवतांची भूमी म्हणून ओळखली जाते. बिंबल-सत्तरी येथील भावे कुटुंबाने उभारलेले महागणपतीचे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण असून भाविकांच्या हाकेला पावणारा, नवसाला पावणारा, मनोकामना पूर्ण करणारा महागणपती, असे हे भक्तांचे श्रध्दास्थान आहे. हे मंदिर ४० वर्षांपूर्वी उभारले आहे.
मंदिराचे प्रमुख पुजारी कै. दामोदर भावे यांचे वडील कै. भिकू भावे यांचे ४० वर्षांपूर्वी निधन झाले. भावे कुटुंब पिढ्यान पिढी गणेशाचे भक्त होते. भिकू भावे यांची गणेश चित्रशाळा होती. त्यांची गणपतीवर अपार श्रद्धा होती.
१९८३ साली भिकू भावे यांचे निधन झाले. काही दिवसांनी भिकू भावे यांनी एके रात्री सुपुत्र कै. दामोदर यांच्या स्वप्नात येऊन ‘घराच्या बाजूला गणेशमूर्तीची स्थापना करा आणि तेथे मंदिर उभारा’, असे सांगितले.
त्यानंतर दामोदर यांनी पुढाकार घेऊन कारवार येथून पंचधातूची सुरेख गणेशमूर्ती आणून तिची स्थापना केली.
भावे कुटुंबीयांची अपार श्रद्धा
पूर्वी मर्यादित स्वरूपात उत्सव साजरे केले जायचे. आता भाविकांची संख्या वाढत आहे. पूर्वी भावे कुटुंबाची स्थिती हालाखीची होती. मात्र, आता देवाने भरभरून दिले. त्यामुळे आतापर्यंत घरात आलेल्या एकाही व्यक्तीला कधी उपाशीपोटी परत पाठविले नाही, विनायक भावे म्हणतात.
महाप्रसाद असो किंवा इतर कोणताही उत्सव, कधीच पैशांची कमतरता भासत नाही. आमचा गणपतीवर पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले.
महाप्रसाद आणि तांबूल
गणेश जयंतीला मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होते. या दिवशी मंदिराला भेट देणारा प्रत्येक भाविक महाप्रसाद घेतल्याशिवाय परत जात नाही. तसेच जेवल्यानंतर भावे कुटुंबीयांतर्फे भाविकांना खास पान (तांबूल) देण्य़ाची पद्धत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.