Bike Rider Killed In Accident Dainik Gomantak
गोवा

Bike Rider Killed In Accident: कुर्टी येथे भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

महामार्गावर भीषण अपघातात; बेशिस्त पार्किंग अपघाताला जबाबदार असल्याचा स्थानिकांचे म्हणणे

गोमन्तक डिजिटल टीम

Bike Rider Killed In Accident: कुर्टी फोंडा येथे महामार्गावर ट्रक आणि दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीत मृत्यू झाला. अशोक श्याम नाईक (वय 47) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

अशोक नाईक हे मूळचे बागवाडा, खांडेपार येथील रहिवाशी होते. ते काही कामानिमित्त दुचाकीवरून बाहेर पडले असता महामार्गावर आमिगोज जंक्शन येथे अचानक समोरून आलेल्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकी थेट ट्रकच्या चाकात आली. यात दुचाकीस्वार अशोक नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक काही अंतर डिव्हायडरवही चढला होता.

अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पुढील तपास करत आहेत. त्यांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. पार्किंग तसेच वाहतुकीला येथे कसल्याही प्रकारची शिस्त नाही. या रस्त्याकडेला ट्रक पार्किंग केले जात असल्यामुळे येथे अपघात घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यावेळी अस्ताव्यस्त पार्किंगमुळे घडणाऱ्या या अपघातांवरून स्थानिकांनी वाहतूक पोलिसांकडे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

दरम्यान, गोव्यात अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी म्हापसा येथे दोन दुचाकी अपघातांत एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाले होते. प्रतिनिधी असलेले दर्शन सिमेपुरुषकर (56, मूळ रा. भाटी-ओशेल) हे दुपारी 12 च्या सुमारास राय-शिवोली येथील घरी जेवणासाठी ॲक्टिवा स्कुटरने जात होते.

हाऊसिंगबोर्ड-म्हापसा येथील सेंट झेवियर कॉलेजच्या मुख्य रस्त्यावर केरळीयन टोळीतील एका दुचाकीसोबत धडक झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुरपावाडा केळशी येथे सोमवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास बस व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात आडपई फोंडा येथील दुचाकीस्वार संतोष सुरेश नाईक (35, रा. आडपई) यांचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT