Goa Accident Case Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: पार्क केलेल्या टेंपोला दुचाकीची धडक! एक तरुण गंभीर जखमी

मुळचा खानापूरचा दुचाकीस्वार मल्लेश बसप्पा देवलतकर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: धारबांदोडा येथे धोकादायक जंक्शनजवळ पार्क केलेल्या टेंपोला दुचाकीने धडक दिल्याने अपघात झाला आहे. मुळचा खानापूरचा दुचाकीस्वार मल्लेश बसप्पा देवलतकर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या तरुणाला अधिक उपचारांसाठी गोमेकॉत दाखल करण्यात आलेले आहे. ग्रामीण भाग असल्याने अरुंद रस्ता, वळणे, झाडेझुडपे वाढल्याने नेहमीच अपघात होत असतात.

(Goa Accident Case)

राज्यात अपघातांचे सत्र चालु असुन, काल ढवळी येथील पेट्रोल पंपजवळ दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला आहे. दरम्यान, तिस्क येथील श्रेया धनंजय कोठारकर वय १८ या युवतीचा मृत्यू झाला आहे.

ग्रामीण भागात अरुंद रस्ता, वळणे, झाडेझुडपे वाढल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ

सांगेत अपघातप्रवण अनेक ठिकाणे आहेत. ग्रामीण भाग असल्याने अरुंद रस्ता, वळणे, झाडेझुडपे वाढल्याने नेहमीच अपघात होत आहेत. बऱ्याच ठिकाणी जमीन खाजगी मालकांची असते किंवा वन खात्याची त्यामुळे जमिनीचे दावे निकाली लागेपर्यंत अनेकदा अपघातात होत असतात.

दरम्यान, त्वरित वळणे कापणे, रस्ते दुरुस्ती करणे गरजेचे असून खड्डेमय रस्ता दुरुस्त करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. आठवड्यापूर्वीच सांगेत अपघातात बळी एक गेला, तो वळणामुळे, असे अनेकदा समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज लागत नसल्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करीत असताना अपघात होतो.

मोकाट जनावरांची समस्या

बऱ्याचदा अपघाताला कारणीभूत एक तर वळणे असतात किंवा मोकाट जनावरे असतात. अशा वळणावर रात्रीच्या वेळी अचानक जंगली जनावरे खास करून गवे रेडे, हरीण, रान डुक्कर सारखी जंगली जनावरे रस्त्यावर आडवी येत असल्याने अपघातात घडलेले आहे.या वर उपाय योजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT