Calangute Crime Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime: ड्रग्ज तस्करीप्रकरणी बिहारच्या युवकास अटक; 2 लाख 60 हजाराचे अमली पदार्थ जप्त

2.6 किलो अमली पदार्थ हस्तगत

Akshay Nirmale

Calangute Crime: गोव्यातील सुप्रसिद्ध कळंगुट परिसरात पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी एका बिहारच्या युवकास अटक केली आहे. रामप्रियाकुमार मिथिलेशकुमार चौधरी (वय 22) असे त्याचे नाव आहे. पोलिस निरीक्षक किरण नाईक यांच्या पथकाने छापा टाकत ही कारवाई केली.

कळंगुट येथील डॉल्फिन सर्कल, नाईकावाडो येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. संशयित चौधरी याच्याकडून भाड्याने घेतलेली स्कूटरही जप्त करण्यात आली आहे.

चौधरी हा सध्या मुस्लीम वाडो, डिचोली येथे राहतो. तो मूळचा वैशाली, बिहार येथील आहे. त्याच्याकडे 2.610 किलो अमली पदार्थ आढळून आले आहेत. तो गांजा असल्याचा संशय आहे. त्याची अंदाजे किंमत 2 लाख 60 हजार इतकी आहे.

पीएसआय नाईक यांच्या पथकाने छापा टाकत ही कारवाई केली. चौधरीला ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांच्या ताफ्यात हेड कॉन्स्टेबल विद्यानंद आमोणकर, पोलिस कॉन्स्टेबल विजय नाईक, आमीर गरड, भगवान पालयेकर, गणपत तिलोजी, गणेश पार्सेकर आणि प्रणय गवस यांचा समावेश होता.

चौधरी याच्याविरोधात एनडीपीएस अॅक्ट 1985 सह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौधरी याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी नॉर्थ गोवाचे पोलिस अधीक्षक निधिन वाल्सन आणि पोलिस निरिक्षक दत्तगुरू के. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नाईक अधिक तपास करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT