Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

Arvind Kejriwal: केजरीवाल म्हणतात... गोव्यात मोठी राजकीय पोकळी, 'आप'शिवाय पर्याय नाही

भाजप गोव्यात चांगलं काम करतेय म्हणून त्यांना मते मिळतायेत असे नव्हे तर त्यांना सक्षम पर्याय नाही - केजरीवाल

Pramod Yadav

Arvind Kejriwal In Goa: एकीकडे येत्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन करणारे अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात 'आप'शिवाय पर्याय नाही असे वक्तव्य केले आहे.

गोव्यात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाल्याचेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गोवा दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील आहेत.

शुक्रवारी त्यांनी बाणावली येथे वेंझी व्हिएगस यांच्या मतदार संघातील मोहल्ला क्लिनिकला भेट दिली व त्यानंतर आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. केजरीवाल यांनी क्रुझ सिल्वा यांच्या मतदारसंघातील कामाचा देखील आढावा घेतला.

भाजप गोव्यात चांगलं काम करतेय म्हणून त्यांना मते मिळतायेत असे नव्हे तर त्यांना सक्षम पर्याय नाही. राज्यात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे आणि आता आपशिवाय पर्याय नाही, असे केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आप त्यांचा पर्याय असल्याचे असे मतदारांना सांगण्याचे आवाहन केले. राज्य सरकारच्या गडबड घोटाळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पक्षांतर्गत एक संवाद प्रणाली सुरु करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

इंडिया आघाडीसोबत जागा वाटपाबाबत चर्चा सुरु असून, गोव्याचा देखील त्यात समावेश आहे, असे केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना चौथे समन्स बाजवले असून, 18 रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. चौकशीला हजर न राहिल्याने केजरीवाल घाबरत असल्याचा आरोप भाजपने केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT