Sonali Phogat  Dainik Gomantak
गोवा

लवकरच उलघडणार सोनाली फोगटच्या हत्येचे गूढ? डिजिटल लॉकरमध्ये CBI ला मिळाले महत्वाचे पुरावे

Sonali Phogat Murder Case: गोवा न्यायालयाच्या परवानगीनंतर सीबीआयने डिजिटल लॉकर उघडले होते.

Pramod Yadav

पणजी: सोशल मीडिया स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट आहे. याप्रकरणाचा तपास करणारी सीबीआय आता हरियाणातील अनेक व्हाईट कॉलर लोकांची चौकशी करणार आहे.

या हायप्रोफाईल प्रकरणात गेल्या वर्षी सीबीआयच्या पथकाने सोनाली फोगट यांच्या घरातून डिजिटल लॉकर जप्त केले होते.

गोवा न्यायालयाच्या परवानगीनंतर सीबीआयने डिजिटल लॉकर उघडले होते. यापूर्वी खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुधीर सांगवान डिजिटल लॉकरचा कोड सांगत नव्हता.

सीबीआयला या लॉकरमध्ये महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत ज्यामुळे या हायप्रोफाईल खून प्रकरणाचे गूढ उकलण्यास मदत होणार आहे.

भाजप नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगट यांचा 23 ऑगस्ट 2022 रोजी गोव्यात ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला होता. सोनाली फोगटचची हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणात अनेकांची नावे समोर आल्यानंतर गृह मंत्रालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला.

सोनाली फोगटचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा सहकारी सुखविंदर सिंग यांना या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. दोन वर्षानंतरही सीबीआय या हायप्रोफाईल हत्याकांडाचे गूढ उकलू शकलेले नाही. सीबीआय हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप सोनाली फोगटच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सीबीआय आमच्या कुटुंबाला कोणतीही माहिती देत ​​नाही. आमच्या अनुपस्थितीत सीबीआयच्या पथकाने सोनाली फोगटचे डिजिटल लॉकर काढून घेतले. आमच्या उपस्थितीत डिजिटल लॉकर उघडायला हवे होते. सीबीआय सोनालीला न्याय देऊ शकत नाही. आम्ही मुंबईतील सीबीआय उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे सोनाली फोगटचा मेहुणा अमन पुनिया यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT