Big scam in government jobs in Goa government BJP mla Babush Monserrate accused on government Dainik Gomantak
गोवा

सरकारचा नोकर भरती घोटाळा,मोन्सेरात यांचा पक्षाला घरचा आहेर तर आपनेही घेरले

सरकारने (Goa Government) जाहीर केलेल्या 10 हजार नोकर भरतीची (Job Scam) प्रक्रिया सुरू असताना तब्बल 35 लाख रुपये घेऊन नोकऱ्या विकण्यात आल्या

दैनिक गोमन्तक

सरकारने (Goa Government) जाहीर केलेल्या 10 हजार नोकर भरतीची (Job Scam) प्रक्रिया सुरू असताना तब्बल 35 लाख रुपये घेऊन नोकऱ्या विकण्यात आल्या, तर साखळी व वाळपई मतदारसंघात त्या खिरापतीसारख्या वाटण्यात आल्या, असा आरोप सत्ताधारी आमदार बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला नोकऱ्या वाटण्याच्या व्यवस्थेचाच आम आदमी पक्षाने (AAP) भांडाफोड केल्याने गोव्यात खळबळ उडाली आहे.(Big scam in government jobs in Goa government BJP mla Babush Monserrate accused on government)

निवडणुका जवळ येत असताना राज्य सरकारने विविध खात्यांमध्ये 10 हजार नोकर भरतीचा घाट घातला असून ही प्रक्रिया सुरूही केली आहे. ही प्रक्रिया ‘गोवा स्टाफ सिलेक्शन’मार्फत होणे अपेक्षित होेते. मात्र, राज्य सरकारने स्वतंत्र यंत्रणा उभा करून या प्रक्रियेला सुरवात केली आहे. यामुळे एकूणच नोकर भरती प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. आता सत्ताधारी भाजपचे मंत्री, आमदारांनीच लाखो रुपये घेऊन या नोकऱ्या विकल्याचा आरोप भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आज करून खळबळ उडवून दिली.

यामुळे गुणवत्ताप्राप्त युवकांवर अन्याय होत असून आम्ही आत्महत्येचा मार्ग अवलंबावा का? असा प्रश्‍न युवक आणि त्यांचे नातेवाईक विचारत आहेत. हे सारे गंभीर असून ही संपूर्ण नोकर भरती प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी मोन्सेरात यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांच्यावर गंभीर आरोप करत बाबूश यांनी शेकडो युवकांकडून पाऊसकर यांनी पैसे घेतल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ही संपूर्ण नोकर भरती प्रक्रिया गोवा स्टाफ सिलेक्शनमार्फतच करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनी सरकारच्या आरोग्य खात्याच्या नोकर भरतीत साखळी आणि वाळपई मतदारसंघातील 95 टक्के उमेदवार असल्याचा सांगून हा मोठा घोटाळा असल्याचा निशाणा साधला आहे. या विरोधात राज्याच्या दक्षता विभागात तक्रार करणार असल्याचे ‘आप’ने म्हटले आहे.

आरोग्य खात्यात साखळी, सत्तरी मतदारसंघातील लोकांना 95 टक्के नोकऱ्या दिल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे अमित पालेकर यांनी केला. हा मोठा भ्रष्टाचार असून त्‍याविरोधात राज्याच्या दक्षता विभागाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

माझ्याकडे उमेदवारांची यादी आहे, ज्यांनी गोमेकॉमध्ये एलडीसीपदासाठी अर्ज केले होते. त्‍यातील 105 उमेदवारांपैकी 96 उमेदवार हे साखळी आणि सत्तरी मतदारसंघातील आहेत. हे उमेदवार कोणत्याही प्रक्रियेशिवाय भरती करण्यात आल्याचा आरोप त्‍यांनी केला. यावरून निवड प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार दिसून येतो असे सांगून गोमेकॉचे नाव बदलून सत्तरी मेडिकल कॉलेज ठेवावे अशी टीकाही त्यांनी केली आहे.

‘आप’ नोकरभरती घोटाळ्याच्या विरोधात राज्याच्या दक्षता विभागाकडे तक्रार करणार आहे. आयपीएचबी फार्मासिस्टची यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतु त्‍यात उमेदवारांचे नाव आणि पत्ता नाही. या घोटाळ्यातून स्पष्टपणे दिसून येते की गोव्यात आता प्रतिभा आणि गुण महत्त्वाचे नाहीत, असे पालेकर म्हणाले.

नोकऱ्या देण्यात पक्षपात करणे हा गोव्यातील तरुणांवर अन्याय असून भाजप सरकार नोकऱ्या देण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप त्‍यांनी केला. ते पुढे म्हणाले मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी निवडणुकीपूर्वी 10 हजार नोकऱ्यांचे गाजर दाखवले. तरुणांनी या गाजराला बळी पडू नये. अशा प्रकारच्या प्रथेला कोर्टात आव्हान दिल्यास सर्व काही बंद होईल. तरुणांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करण्याची वेळ आली आहे, असे पालेकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT