CM pramod sawant Dainik Gomantak
गोवा

निवडणुकीआधीच मुख्‍यमंत्र्यांची मोठी राजकीय घोषणा

निवडणुकीआधीच मुख्‍यमंत्र्यांनी केले 'हे' मंत्री जाहीर, इतर उमेदवारांच्‍या उंचावल्‍या भुवया

दैनिक गोमन्तक

पणजी : सासष्‍टी तालुक्‍यातील आठही जागा भारतीय जनता पार्टी जिंकेल असा विश्‍‍वास व्‍यक्त करत निवडणुकीपूर्वीच मडगावचे उमेदवार बाबू आजगावकर हे नव्‍या मंत्रिमंडळात उपमुख्‍यमंत्री तर फातोर्ड्याचे उमेदवार दामोदर नाईक मंत्री असतील, अशी घोषणा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी केल्‍याने सर्वत्र चर्चेला ऊत आला आहे.

मडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यापूर्वीच मुख्‍यमंत्र्यांनी गोविंद गावडे, रवी नाईक यांनाही मंत्री करण्‍याचे जाहीर केल्‍याने इतर उमेदवारांच्‍या भुवया उंचावल्‍या आहेत.

यावेळी मुख्‍यमंत्री (CM) पुढे म्‍हणाले की, बाबू आजजगावकर यांना मडगावातील अल्पसंख्याक मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून दिगंबर कामत वैफल्यग्रस्त झालेले आहेत. कामत यांनी साखळी मतदारसंघात हस्तक्षेप करण्यापेक्षा त्यांचा ढासळत चाललेला गड सांभाळावा. भाजपवर टीका करणाऱ्या विजय सरदेसाई यांनी काब्रस्तानाची ती जामीन रूपांतर करण्यामागील कारण स्पष्ट करावे असे आवाहन सावंत यांनी केले आहे.

भाजप (BJP) पहिल्याच वेळी सासष्टी तालुक्यातील आठही मतदारसंघांत निवडणूक (Election) लढवत असून तेथे सर्वत्र ‘कमळ’च फुलणार आहे असा विश्वास त्‍यांनी व्यक्त केला. डॉ. सावंत यांच्‍याबरोबर सासष्टीतील मडगावचे उमेदवार बाबू आजगावकर, फातोर्ड्याचे दामू नाईक, नावेलीचे उल्हास तुयेकर, वेळ्‍ळीचे सवियो रॉड्रिगीस, नुवेचे दत्ता बोरकर, कुडतरीचे अँथनी बार्बोसा, बाणावलीचे दामोदर बांदोडकर यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

SCROLL FOR NEXT