land scam
land scam Dainik Gomantak
गोवा

‘झुआरी ॲग्रो’कडून मोठा जमीन घोटाळा

दैनिक गोमन्तक

कळंगुट : व्यावसायिक कारणासाठी झुआरी ॲग्रो कंपनीकडून स्थानिक कोमुनिदादकडून नव्यान्नव वर्षाच्या करारावर ताब्यात घेतलेली पन्नास लाख चौरस मीटरची जमीन परस्पर विक्रीस काढण्यात आलेले प्रकरण आतापर्यतचा सर्वात मोठा राज्यातील जमीन घोटाळा आहे. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसकडून हा मुद्दा धसास लावण्यात येणार असल्याचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी पर्रा(Parra) येथे सांगितले.

राज्यातील इतर ठिकाणी विशेष करून बार्देशात मूळ गोमंतकीय मालकांच्या जमिनी बनावट कागदपत्रांद्वारे अनेकांकडून परस्पर विक्रीस काढण्यात आलेल्या आहेत. या घोटाळ्यांचीही सरकारने हल्लीच स्थापन केलेल्या एसआयटी विभागाकडून चौकशी सुरू असून चौकशीअंती लवकरच त्या जमिनी गमावलेल्या मूळ गोमंतकीयांना त्यांच्या जमिनींचा हक्क प्राप्त होणार असल्याचे लोबो यांनी पुढे सांगितले.

पर्रा पंचायत परिसरात स्थानिक लोकांना कवाथे तसेच फळे देणाऱ्या रोपट्यांचे आज वितरण केल्यानंतर ते बोलत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Agonda Panchyat : आगोंद पंचायत क्षेत्रात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम संथगतीने

Lairai Devi Jatra 2024 : हजारो भाविकांनी अनुभवले ‘अग्निदिव्य’; देवी लईराई जत्रोत्सव उत्साहात

Margao News : मडगावातील गटारांची साफसफाई; पहिली फेरी पूर्ण

Smart City : रायबंदरवासीयांना मरण यातना! स्‍मार्ट सिटीचा फटका

Smart City : जेव्हा राजधानी पणजी शहराचे वय शोधले जाते...

SCROLL FOR NEXT