Kadamba Transport Dainik Gomantak
गोवा

Kadamba Transport: गोव्यातील खासगी बस सेवेबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री...

कदंब महामंडळाला उर्जितेवस्थेसाठी प्रयत्न; सध्या विविध मार्गांवर सुमारे 1,500 खासगी बसेस धावत

Akshay Nirmale

Kadamba Transport: गोव्यातील कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड (KTCL) ला फायद्यात आणण्यासाठी तसेच गोव्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी गोवा सरकारकडून पावले उचचली जात आहेत.

राज्यातील विविध मार्गांवर धावणाऱ्या सर्व खाजगी बसेस ताब्यात घेऊन ती कदंब परिवहन अंतर्गत चालविण्याचा मानस राज्य सरकारचा आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. सध्या विविध मार्गांवर सुमारे 1,500 खासगी बसेस धावत आहेत.

शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील तोट्यात चालणारी महामंडळे ताब्यात घेणार असल्याचे म्हटले होते. त्यावर कदंबा महामंडळ तोट्यात असल्याचे विचारले असता मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, कदंब महामंडळाला राज्य सरकारने महामंडळाला खासगी बसेस चालविण्याचे काम सुचविले आहे.

राज्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी केटीसीएलच्या माध्यमातून गोव्यातील विविध मार्गांवर चालणाऱ्या खासगी बसेस कदंबकडे घेण्याचे सरकारचा विचार आहे. सरकारी महामंडळामार्फत टॅक्सी आणि काही दुचाकी सेवा जसे की पायलट ऑन बोर्ड घेण्याचाही आमचा मानस आहे. संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करणे हाच यामागील उद्देश आहे.

2012 मध्ये, मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारने असाच एक प्रकल्प प्रस्तावित केला होता, तथापि, खाजगी बस ऑपरेटरच्या विरोधामुळे तो प्रत्यक्षात आला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

Goa Water Metro Project: 'प्रकल्प नेमका कुणासाठी?' वॉटर मेट्रोच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT