मांद्रे येथे रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मांद्रे मतदार संघ भाजपा निरीक्षक गोरख मांद्रेकर उपस्थित होते . Dainik Gomantak
गोवा

Goa : मांद्रे विकासाला मोठा हातभार : आमदार दयानंद सोपटे

दैनिक गोमन्तक

मोरजी: कोरोना काळात (Corona Period) जीवाची पर्वा न करता पेडणे तालुक्यातील पत्रकारांनी (Journalist) आपले कार्य अखंडित चालू ठेवले , दररोज कोरोनाविषयी वृत्त सविस्तर देणे , आरोग्याच्या (Health) समस्या कोरोना सेंटरचा (Corona Center) पाठपुरावा करत असतानाच लोकप्रतिनिधी चुकत असेल तर त्याठिकाणी आवाज उठवणे , समस्या सरकारच्या (Government) निदर्शनात आणत असतांना मांद्रे मतदार संघाच्या विकासालाही (Development) मोठा हातभार असल्याचे प्रतिपादन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी मांद्रे भाजपा तर्फे पेडणे तालुक्यातील पत्रकारांचा गौरव केल्यानंतर केले.

मांद्रे येथे रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मांद्रे मतदार संघ भाजपा निरीक्षक गोरख मांद्रेकर उपस्थित होते .

यावेळी निवृत्ती शिरोडकर , विठोबा बगळी ,मकबूल माळगीमणी ,चंद्रहास दाभोलकर , राजेश परब , जयेश नाईक ,विनोद मेथर , संदीप कामुलकर , प्रसाद पोळजी , अस्मिता पोळजी आदींचा शाल श्रीफळ पुष्प व भेट वस्तू देवून गौरव केला.

यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळ चेरमेन तथा आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना , आगरकर टिळकपासून सुरु असलेली पत्रकारिता आजही ग्रामीण भागातील पत्रकार अल्प मानधन घेवून काम करतात , त्यांच्या समस्या अडचणी आज पर्यंत कुणीच समजून घेत नाही , त्यांचे त्याना अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. असे सांगून , पेडणेतील सर्व पत्रकार जागृत असल्याने विकासालाही गती मिळते असे सांगितले . पत्रकार अविरत कार्य करीत असल्याचे दाखल घेवून भाजपा ने त्यांचा गौरव आयोजित केला आणि त्याला मान्यता दिल्याने पत्रकारांचे अभिनंदन केले .

सविस्तर निपक्ष वृत्त देणारे पत्रकार : गोरख मांद्रेकर

मांद्रे मतदार संघातील पत्रकार किती जागृत आहेत हे सकाळी कोणतेही वर्तमान पत्र उघडले कि लक्षात येते , निपक्ष वृतांकन तेही सविस्तर वाचायला याच मतदार संघातील पत्रकारांचे वाचायला मिळते ,जसे आजपर्यंत पत्रकारांनी सहकार्य केले तेही यापुढे अपेक्षित आहेत ,असे मांद्रेकर म्हणाले .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT