Vijay Sardesai And Basavaraj Bommai on Mahadayi  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: मोठ्या भावाची दमदाटी खपवून घेतली जाणार नाही; सरदेसाईंचा बोम्मईंना ईशारा

आम्ही शेवटपर्यंत तुमच्याशी लढू! : विजय सरदेसाई

Rajat Sawant

Mahadayi Water Dispute: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी म्हादई विषयावर प्रतिक्रिया दिली होती. यावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्यर न दिल्याने मुख्यमंत्र्यांवर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी टिका केली आहे. तसेच बोम्मईंनाही त्यांनी यावेळी ईशारा दिला.

सरदेसाई यांनी ट्विट करत टिका केली आहे. ते म्हणाले, मी गोव्यासाठी गोंयकार म्हणून बोलतोय. बसवराज बोम्मईंच्या उपहासात्मक टीकेला उत्तर देण्यासाठी मी डॉ. प्रमोद सावंत यांची वाट पाहिली. कर्नाटकचे माननीय मुख्यमंत्री, तुमचे राजकारण घरी ठेवा. मोठ्या भावाच्या गुंडगिरीला आम्ही घाबरणार नाही. म्हादईसाठी गोवा खंबीर आणि एकजूट आहे. कोणतीही चूक करू नका, आम्ही शेवटपर्यंत तुमच्याशी लढू! असा ईशार बोम्मईंना आमदार विजय सरदेसाई यांनी दिला आहे.

दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल संध्याकाळी प्रत्युत्तर दिले आहे. "कुणाला काही म्हणायचे आहे ते म्हणो. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. कायदेशीरदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या म्हादई बचावासाठी जे काही करण्याची गरज आहे ते आम्ही करत आहोत आणि आम्ही ते यापुढेही करत राहू. म्हादईचा लढा आम्हीच जिंकू", असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.

बोम्मईंच्या आडमुठेपणाच्या भूमिकेवर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी प्रतिक्रिया दिली. बसवराज बोम्मई सध्या 'निवडणूक मोडवर' आहेत. त्यामुळे ते काहीही वक्तव्य करु शकतात असा टोला बोम्मईंना लगावला होता.

"येत्या मे महिन्यात कर्नाटकात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सध्या 'निवडणूक मोडवर' आहेत. त्यामुळे ते काहीही वक्तव्य करु शकतात. परंतु त्याचा आमच्या म्हादई लढ्यावर कोणताच परिणाम होणार नाही. आम्ही ही लढाई जिंकू" असा आशावाद पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यानी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Beach Assault Case: बंगळुरुच्या पर्यटकाला अमानुष मारहाण, कळंगुटमधील 'त्या' शॅकचा परवाना निलंबित; सरकारनं उगारला कारवाईचा बडगा

Ram Navami Wishes in Marathi: गुरुवारी आली रामनवमी, सुवर्णयोगाची पर्वणी! राम नवमीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश

Delhi Police: 21 अत्याधुनिक शस्त्रे, 200 काडतुसे जप्त, 10 जणांना ठोकल्या बेड्या; पाकिस्तान-बांगलादेश मॉड्यूलचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश

VIDEO: 'AI मध्ये भारत पुढे, पण क्रिकेटमध्ये आम्हीच भारी', पंतप्रधान मोदींना सुनक यांचं मिश्किल उत्तर; जगाचं वेधलं लक्ष

Mangal Aditya Rajyoga 2026: 2 एप्रिलला महाधमाका! 'मंगळ-आदित्य' राजयोगामुळे उजळणार 'या' 3 राशींचे भाग्य; धनवर्षावासह होणार प्रगतीचे नवे मार्ग खुले

SCROLL FOR NEXT