Chandrakant Shetye  Dainik Gomantak
गोवा

'डिचोली मतदारसंघात सुसज्ज मैदाने उपलब्‍ध करणार'

आमदार चंद्रकांत शेट्ये: क्रीडामंत्र्यांसमवेत केली साळ मैदानाची पाहणी

दैनिक गोमन्तक

साळ: डिचोली मतदारसंघातील प्रत्येक गावात सुसज्ज मैदाने उपलब्ध करून देणार, असे आश्‍‍वासन आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिले. त्या अनुषंगाने त्‍यांनी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्‍याकडे पाठपुरावा केला होता. त्‍यानुसार मतदारसंघातील प्रत्येक गावात खेळाडूंच्या समस्या व मैदानाची स्थिती जाणून घेण्‍यासाठी आमदार शेट्ये व क्रीडामंत्री गावडे यांनी विविध भागांना भेटी दिल्या.

साळ पंचायत क्षेत्रातील खोलपेवाडी येथील मैदानाची पाहणी करताना उभयतांसमवेत ग्रामस्‍थ उपस्‍थित होते. छत्रपती शिवाजी क्रीडा आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष रामदास वरक यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी क्रीडामंत्री गावडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मुलांमध्ये क्रीडा कौशल्य आहे, पण त्यांच्या कौशल्याला योग्य दिशा मिळत नाही. कारण मैदानांची कमतरता होय. ग्रामीण भागातील मुलांना मैदानांचा जास्त प्रमाणात लाभ व्हावा त्याची दखल घेतली जाईल.

आमदार शेट्ये म्‍हणाले की, डिचोली मतदारसंघातील खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर झळकतील यासाठी विविध उपक्रम राबविले जातील. क्रीडा मंडळाचे सचिव मंदार पाटील, शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक नितीन नाईक, सायली सावळ, प्रदीप वरक, महादेव रेडकर, ऋषभ रेडकर, आरुष जंगले आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT