Bicholim Dam Dainik Gomantak
गोवा

Bicholim Amthane Dam : आमठाणे’तील जलसाठ्यात घट

पातळी 46.5 मीटर : साळ बंधाऱ्यातील पाणी धरणात सोडल्याने मुबलक पाणी उपलब्ध

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : डिचोलीतील आमठाणे धरणातील जलसाठा घटला असला, तरी धरणातील जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आता साळ बंधाऱ्यातील पाणी या धरणात सोडण्यात येत आहे. गत महिन्याच्या तुलनेत धरणातील पाण्याच्या पातळीत किंचित घट झाली आहे.

सध्या धरणातील जलसाठ्याची पातळी 46.5 मीटर इतकी आहे. गत महिन्यात ती 46.80 मीटर एवढी होती. हवामानात बदल होताना उष्णतेने कहर केला असला, तरी जलसाठ्यात मोठी घट झालेली नाही.

मेणकूरे-धुमासे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमठाणे धरणाचे क्षेत्र 582 हेक्टर मीटर एवढे आहे. तर पाण्याची पातळी 50 मीटर एवढी आहे. मंगळवारपर्यंत या धरणातील जलसाठ्याची पातळी 46.5 मीटर एवढी होती, अशी माहिती मिळाली आहे. गत वर्षी समाधानकारक मोसमी पाऊस पडल्यानंतर आमठाणे धरणातील जलसाठ्याची पातळी समाधानकारक होती.

जलसाठ्यावर परिणाम नाही

आमठाणे धरणातील पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडण्यात येते. धरणातील जलसाठ्यात घट होऊ लागली, की जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी साळ येथील शापोरा नदीवरील बंधाऱ्यातील पाणी मोठ्या जलवाहिनीद्वारे या धरणात सोडण्यात येते. मोसमी पाऊस सुरू होईपर्यंत धरणातील जलसाठ्यात फार मोठा परिणाम होणार नाही, असा जलस्रोत खात्याचा दावा आहे.

पाण्याचा जपून वापर करावा

राज्यात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनची अपेक्षा असते. मात्र गेल्या काही वर्षांतील अनुभव पाहता पाऊस जूनच्या मध्यापर्यंत राज्यात दाखल होत नाही. ही स्थिती यंदा आल्यास राज्यात अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल. त्यामुळे लोकांनी पुढील काळात पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

समाधानकारक स्थिती : पावसाळ्यात हे धरण दोन वेळा तुडुंब भरले होते. दरवर्षी साधारण एप्रिल-मे महिन्यात धरणातील जलसाठ्यात घट होऊन सभोवतालचे पात्र कोरडे पडत असते. मात्र, यंदा स्थिती समाधानकारक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT