Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim: अखेर डिचोली बाजारातील पाण्याची गळती बंद, फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती; 'नवा सोमवार'पूर्वी पाण्याची समस्या सुटणार

bicholim water pipeline: डिचोलीच्या बाजारात दोन ठिकाणी फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती केल्याने पाण्याची गळती अखेर बंद झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: डिचोलीच्या बाजारात दोन ठिकाणी फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती केल्याने पाण्याची गळती अखेर बंद झाली आहे. (बुधवारी) सकाळी हे दुरुस्तीकाम करण्यात आले. दरम्यान, ‘नवा सोमवार’पूर्वी शहरातील अन्य ठिकाणी जलवाहिनीची दुरुस्ती करून पाण्याची नाशाडी थांबविण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा खात्याचेही त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मिळाली आहे. येत्या २४ तारखेला डिचोलीचा प्रसिद्ध ‘नवा सोमवारा’ साजरा करण्यात येणार आहे. डिचोली शहरातील काही ठिकाणी जलवाहिनीतून पाण्याची गळती होत आहे.

त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. ठिकठिकाणी पाणी साचून रहात असल्याने ग्राहक व विक्रेत्यांना अडथळा निर्माण होत आहे. भर आठवडी बाजाराच्या दिवशी जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी रस्ता खोदल्याने विक्रेते आणि ग्राहक काहीसे नाराज झाले होते. सकाळी दहानंतर मात्र ही समस्या सुटली.

आठवडी बाजारात गोंधळ

आज (बुधवारी) न्यायालय इमारतीजवळ तसेच पालिका इमारतीच्या मागे मिळून बाजारातील रस्त्यावर दोन ठिकाणी रस्ते खोदून जलवाहिनीचे दुरुस्तीकाम करण्यात आले. ऐन आठवडी बाजाराच्या दिवशी दुरुस्तीकाम हाती घेतल्याने सकाळच्यावेळी बाजारात गोंधळ निर्माण होताना काहीसी अडचण निर्माण झाली. दुचाकी सोडल्यास अन्य वाहने बाजारात नेताना अडचणीचे बनले होते. त्यामुळे विक्रेते आणि ग्राहकांची काही प्रमाणात गैरसोय झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Budget Session 2026: गदारोळात गोवा विधानसभा अधिवेशनाचा समारोप! अर्थसंकल्प मंजूर; आचारसंहितेमुळे 7व्या दिवशीच वाजले सूप

VIDEO: ''माझी इच्छा आहे की, एक दिवस त्यानं माझ्या जागेवर यावं अन्...'', कॅप्टन कूलच्या 'त्या' पोस्टवर काय म्हणाला गंभीर?

Middle East War: "इराण सोडण्याच्या घाईत जीव धोक्यात घालू नका!" भारतीय दूतावासाकडून नवी नियमावली जारी; सीमा ओलांडण्यावर कडक बंदी

VIDEO: धुरंधरमध्ये 'पाकिस्तानी गाणं'! सिंगर हसननं केला मोठा खुलासा; निर्मात्यांनी 55 लाख दिल्याचा केला दावा

PAK vs BAN: "...मग आता ट्रॉफी चोरुन आणणार का?" PCB प्रमुखांच्या 'त्या' कृत्यावरुन अकमलनं उडवली खिल्ली; बांगलादेश मालिका गमावल्याचा काढला राग

SCROLL FOR NEXT