Vhalshi Junction Accident Dainik Gomantak
गोवा

Bicholim: ..आणखी कितीजणांचे 'बळी' जाण्याची वाट पाहणार? व्हाळशीतील अपघात टाळण्यासाठी मागणी; जंक्शन ठरतेय मृत्यूचा सापळा

Vhalshi Junction Accident: डिचोली बगलमार्गाच्या व्हाळशी जंक्शनवरील अपघात टाळण्यासाठी त्याठिकाणी ‘गतिरोधक’ बसवतानाच आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: डिचोली बगलमार्गाच्या व्हाळशी जंक्शनवरील अपघात टाळण्यासाठी त्याठिकाणी ‘गतिरोधक’ बसवतानाच आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

व्हाळशी जंक्शनवर अपघातांचे सत्र सुरूच असून, हे जंक्शन मृत्यूचा सापळा बनले आहे. बगलमार्ग वाहतुकीस सुरू झाल्यापासून दीड वर्षात आतापर्यंत व्हाळशी जंक्शनवर लहानमोठे मिळून दहाहून अधिक अपघात झाले आहेत.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी म्हणजेच गेल्या रविवारी या जंक्शनवर झालेल्या अपघातातील मोटरसायकल चालक अखेर मृत्युमुखी पडल्याची माहिती उपलब्ध झाली होती. गेल्या रविवारी या जंक्शनवर ट्रकची जोरदार धडक बसल्याने बार्देशमधील मोटारसायकलचालक गंभीर जखमी झाला होता. जखमीवर इस्पितळात उपचार सुरू होते.

अपघातांवर नियंत्रण यावे म्हणून व्हाळशी जंक्शनवर ‘रम्बलर्स’ घालण्यात आले होते. मात्र, या ‘रम्बलर्स’वरून गतीने वाहतूक झाली की, खासकरून रात्रीच्यावेळी मोठा आवाज होत असे. परिणामी जवळपासच्या लोकांची झोपमोड होतानाच त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत असे.

हे ‘रम्बलर्स’ काढून त्याठिकाणी गतिरोधक घालावेत, अशी स्थानिकांची मागणी होती. अखेर या मागणीचा विचार करून सार्वजनिक बांधकाम खात्याने महिन्यापूर्वी व्हाळशी येथील ‘रम्बलर्स’ काढले आहेत. मात्र, त्यानंतर गतिरोधक बसवण्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

आणखी किती बळी घेणार

व्हाळशी जंक्शन वाहतुकीस अत्यंत धोकादायक ठरत आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रणासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने या जंक्शनवर सदैव वाहनचालकांचा गोंधळ उडत असतो. यातूनच अपघात घडत असतात. ‘रम्बलर्स’ काढल्यानंतर या जंक्शनवर भयानक अपघात घडले आहेत. मात्र, गतिरोधक बसवण्याकडे दुर्लक्ष झाले. त्याबद्दल रोहिदास गाड आणि इतर स्थानिकांनी नाराजी व्यक्त करून आणखी कितीजणांचे बळी जाण्याची वाट पाहत आहात, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: प्रियोळ ‘झेडपी’वर ‘मगो’चा वरचष्मा! ढवळीकरांची रणनीती आखायला सुरुवात; गावडेंच्या भूमिकेवर लक्ष

Goa: 'वीज मंत्र्यांनी जनतेला स्पष्टीकरण द्यावे'! मीटरच्या नोटिशीवरुन काँग्रेस आक्रमक; अभियंत्यास घेराव घालून विचारला जाब

Commonwealth Games 2030: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 'क्रिकेट'चे सामने होणार?सामन्यांसाठी अहमदाबाद नव्हे तर 'या' शहराची निवड

Goa Live Updates: अवजड ट्रकची स्कॅनरला धडक, नशेत होता चालक

'IFFI 2025'त 'ही मॅन' धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहताना आमिर खान भावुक! जुन्या आठवणींना दिला उजाळा

SCROLL FOR NEXT