Bicholim Murder Dainik Goamntak
गोवा

Bicholim Murder: 'पोरक्‍या झालेल्‍या चिमुकलीला न्‍याय द्या'! डिचोली खूनप्रकरणी ग्रामस्‍थ आक्रमक; पोलिस स्थानकावर धडक

Goa Murder Case: संपूर्ण राज्‍यात खळबळ उडवून दिलेल्या न्यूवाडा-वाठादेव येथील रबिया हवांगी हिच्‍या खूनप्रकरणी संघटित झालेले मुस्लिम बांधव आता आक्रमक बनले आहेत.

Sameer Panditrao

डिचोली: संपूर्ण राज्‍यात खळबळ उडवून दिलेल्या न्यूवाडा-वाठादेव येथील रबिया हवांगी हिच्‍या खूनप्रकरणी संघटित झालेले मुस्लिम बांधव आता आक्रमक बनले आहेत. रबिया हिची निर्दयपणे हत्‍या करणारा तिचा पती मैनुद्दीन हवांगी याला कठोर शिक्षा व्‍हावी व या दाम्‍पत्‍याच्‍या पोरक्या झालेल्या चार वर्षीय बालिकेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करत मुस्लिम समाजातील युवकांनी शनिवारी रात्री उशिरा डिचोली पोलिस स्थानकावर धडक दिली.

गोवा यूथ फाऊंडेशनचे कार्यकर्ते अल्ताफ संदी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस स्थानकावर धडक दिलेल्यांमध्ये दोनशेहून अधिक मुस्लिम युवक सहभागी झाले होते. फाऊंडेशनचे कार्यकर्ते अल्ताफ संदी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांच्या शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक विजय राणे सरदेसाई यांची भेट घेऊन खून प्रकरणी न्याय द्यावा, अशी मागणी केली.

या प्रकरणात तपासकामात पोलिसांना सहकार्य करतानाच, न्याय मिळेपर्यंत प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचा निर्धारही ग्रामस्‍थांनी केला आहे. रात्री सव्वाअकरा वाजेपर्यंत साधारणत: दीड तास मुस्लिम बांधव पोलिस स्थानकाबाहेर ठाण मांडून होते.

दोन दिवसांपूर्वी म्‍हणजे शुक्रवारी (ता. २५) दुपारी न्यूवाडा-वाठादेव येथे भररस्त्यावर रबिया हवांगी हिचा क्रूरपणे खून करण्यात आला.

या प्रकरणी पोलिसांनी रबिया हिचा पती मैनुद्दीन हवांगी याला अटक केली असून, त्याला दहा दिवसांच्या पोलिस कोठडीचा रिमांड घेण्यात आला आहे. पतीला पोलिसांनी अटक केली असली तरी निर्दयपणे केलेल्या या खूनप्रकरणी स्थानिकांमध्‍ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

रबिया हिचा खून झाल्याने तिची चार वर्षीय मुलगीही पोरकी झाली आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे ग्रामस्‍थ आक्रमक झाले आहेत. रबिया खूनप्रकरणी न्याय मिळेपर्यंत प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचा निर्धारही मुस्लिम बांधवांनी केला आहे.

रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा

खूनप्रकरणी शरण आलेला संशयित आरोपी रबिया हिचा पती मैनुद्दीन याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या संशयित दहा दिवसांच्या रिमांडवर पोलिस कोठडीत आहे. या खूनप्रकरणी योग्य दिशेने तपास सुरू असून, पोलिस महत्त्‍वाचे पुरावे आणि धागेदोरे मिळवत आहेत, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. तरीसुद्धा या प्रकरणी न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरण्‍याचा इशारा अल्ताफ संदी यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT