Accident Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत ट्रकची दुचाकीला धडक; सुदैवाने युवक बचावला

अपघातात मोटारसायकलची मात्र मोडतोड झाली.

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोलीत ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक केवळ सुदैवाने बचावला. हा अपघात आज (शनिवारी) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास बगलमार्गाला जोडून म्हावळिंगेच्या दिशेने गेलेल्या रस्त्यावरील जंक्शनवर घडला.

यासंबंधी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकलवरून एक युवक बगलमार्गे बसस्थानकाच्या दिशेने येत होता. मोटारसायकलस्वार म्हावळिंगे रस्त्याच्या जंक्शनवर पोचला, त्याचवेळी साखळीहून येणाऱ्या ट्रकचालकाने ट्रक उजव्या बाजूने म्हावळिंगेच्या दिशेने आत वळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रकची समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरात धडक बसली. त्यात मोटारसायकल रस्त्यावर आडवी झाली. या अपघातात किरकोळ जखम वगळता दुचाकीस्वार सुदैवाने बचावला. अपघातात मोटारसायकलची मात्र मोडतोड झाली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत न नेता नंतर आपसात मिटवण्यात आल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

Goa Kala Academy : कला अकादमीला आता तरी जाग येणार का?

Women's Reservation Bill 2026: महिला आरक्षण फसलेला की फसवलेला प्रयोग?

खास 'आदमी पक्ष'!- संपादकीय

Marriage Registration: पोर्तुगीज कायद्याचा अडथळा दूर! रशियन महिला आणि कोलव्याच्या तरुणाच्या लग्नाला हायकोर्टाचं ग्रीन सिग्नल; काय नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT